अल्पेश करकरे
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यातच देशात ओमायक्रॉन व्हेरियंटसह कोरोनाचं संकट वाढत असल्यानं अनेक राज्यांमध्ये नियम कडक केले जात आहेत. आता पश्चिम बंगाल, हरियाणा मध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सर्व शाळा, कॉलेज, सलून, उद्यानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच खासगी आणि सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही 50 टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत.एकप्रकारे जवळजवळ बंगालमध्ये मिनी लॉकडाउन करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील मिनी लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती विदारक बनत चालली आहे. राज्यात रुग्ण संख्येबरोबरच आतापर्यंत सरकारमध्ये असणारे आणि जनतेच प्रतिनिधित्व करणारे 13 मंत्री आणि 70 आमदार कोरोना बाधित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार आता मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत अशी माहिती मिळत आहे.राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा अभ्यासानुसार आता निर्बंध कडक करण्याशिवाय पर्याय नाही असे प्रशासनाला वाटत आहे . त्यामुळे राज्यात विकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन कारण्याविषयी सरकार प्रशासन विचार करत आहे.तर इतर दिवशी नवे निर्बंध लागू करण्याचा तयारीत सरकार आहे अशी माहिती एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खाजगीत दिली आहे.
कोणते निर्णय घेतले जाऊ शकतात व काय सुरु, काय बंद असण्याची शक्यता...
> रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत रात्रीची संचारबंदी, गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई होणार>> मॉल, बार, रेस्टॉरंट वेळात बदल करण्याचा निर्णय,तसेच ‘टेक अवे’ सर्व्हिस सुरु राहणार>> सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज केलं जाण्याची शक्यता>> राज्यातील सर्व उद्योग चालू ठेवण्याचा, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध न ठेवण्याचा विचार आहे.>> सर्व बांधकामे सुरु राहण्याची शक्यता>> सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार>> भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील>> शुटिंगवर गर्दी होणार नाही अशी ठिकाणी परवानगी दिली जाणार. राज्यातील चित्रपटगृहे 50 टक्के परवानगीने >> सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहणार. मात्र प्रवास करताना मास्क बंधनकारक>> 50 टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार>>सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीतअंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती>>पर्यटनस्थळावर जमावबंदी>> शाळा महाविद्यालये बंद >> थिएटर्स, मल्टिप्लेक्स, बँक्वेट हॉल, स्पा, जिम आणि मनोरंजन पार्क 50 टक्के क्षमतेने>>दुकाने सकाळी दहा ते रात्री 10 या वेळेत सुरु राहतील. >> मेट्रो आणि बसेस 50 टक्केंच्या क्षमतेने सुरु राहतील. >> रेस्टॉरंट्स, बार 50 टक्के क्षमतेने सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. असे सर्व वरील नियम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.शनिवार, रविवार कडकडीत बंद करण्याची शक्यताराज्यात शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. सोमवार ते शुक्रवार पर्यंत राज्य सरकारच्या नियमावलीनुसार काही गोष्टी सुरु राहणार आहेत. मात्र शनिवार आणि रविवार कठोर निर्बंध असणार आहेत अशी देखील माहिती मिळत आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद करण्याची शक्यता आहे. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहण्याची शक्यता आहे.
अंतिम निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेणारराज्यात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामध्ये निर्णय घेण्यावरून अधिकारी व नेत्यांमध्ये मतभेद असल्याची माहिती देखील मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात लॉकडाऊन लागू नये यासाठी नेते मंडळी प्रयत्न करत आहेत तर अधिकारी वर्ग कडक निर्बंध किंवा मिनी लॉक डाउन यावर आग्रही आहेत. त्यामुळे या सर्व निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांसोबत व उपमुख्यमंत्र्यांचा सोबत एक म्हतवाची बैठक या दोन दिवसात पार पडून , अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिनी लॉकडाउन किंवा कठोर निर्बंधयावर आता काय निर्णय होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .