24 Feb, 22 07:50 PM
मलिकांचा राजीनामा मागण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, थोरातांचा हल्लाबोल
"केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई केले. केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात आघाडी एकत्र लढा देत असून भाजपाला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा आणि आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे’, असा जोरदार टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
24 Feb, 22 05:22 PM
नवाब मलिकांच्या तीन मागण्या कोर्टाकडून मान्य
नवाब मलिक यांनी कोर्टाकडे केलेल्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात दैनंदिन औषधं घेऊ देणं, रोज घरगुती जेवणाची मुभा आणि चौकशीवेळी वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
24 Feb, 22 04:42 PM
येत्या दोन-तीन दिवसात आणखी काही नेत्यांवर कारवाई होणार; चंद्रकांत पाटील यांचा दावा
मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचं मुंबईतील दादर येथे आंदोलन सुरू असून याचं नेतृत्त्व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करत आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी काही नेत्यांवर ईडीची कारवाई होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
24 Feb, 22 03:53 PM
मुंबईत दादर येथे नवाब मलिकांविरोधात भाजपाचं आंदोलन
24 Feb, 22 02:29 PM
नवाब मलिक यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरुन लाइव्ह...
24 Feb, 22 12:52 PM
ठाण्यात भाजपाचं महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन
24 Feb, 22 12:44 PM
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाचं आंदोलन
24 Feb, 22 12:39 PM
नागपूरात मलिकांच्या विरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक
24 Feb, 22 12:37 PM
नागपुरात भाजपाचं आंदोलन, नवाब मलिकांचा पुतळा जाळला
नागपुरात नवाब मलिक यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं असून नवाब मलिक आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांचा पुतळा जाळण्यात आला. (फोटो- विशाल महाकाळकर)
24 Feb, 22 12:09 PM
पालघर, अमरावती येथे भाजपा कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू
24 Feb, 22 12:08 PM
सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, मलिकांची बहीण डॉ. सईदा खान यांची प्रतिक्रिया
24 Feb, 22 11:27 AM
सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, मलिकांची बहीण डॉ. सईदा खान यांची प्रतिक्रिया
24 Feb, 22 10:52 AM
महाविकास आघाडीचे नेते आंदोलनाला बसले; मंत्री, प्रमुख नेत्यांची हजेरी
24 Feb, 22 10:43 AM
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
24 Feb, 22 09:40 AM
महाविकास आघाडीचे नेते एकवटले, ईडी कारवाईविरोधात आंदोलन करणार
नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची महाविकास आघाडीची भूमिका. मंत्रालयासमोरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर ईडीच्या कारवाईचा करणार निषेध. आंदोलनाला मंत्री, कार्यकर्ते हजर राहतील. शुक्रवारपासून राज्यभरात मोर्चा, धरणं आंदोलन करणार आहे अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
24 Feb, 22 09:02 AM
मलिकांच्या अटकेवर भाजपाचा शिवसेनेला प्रश्न
ज्या दाऊदने शिवसेना भवनजवळ बॅाम्बस्फोट घडविला अशा आतंकीसोबत जमिनीचा व्यवहार करणा-यांचं समर्थन शिवसेना आता फक्त मुख्यमंत्रीपदासाठी करणार का? भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला प्रश्न विचारला.
24 Feb, 22 07:50 AM
भाजपा कार्यकर्ते राज्यभर करणार आंदोलन
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी आजपासून निदर्शने करणार आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून निदर्शने सुरू करावीत असं आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
23 Feb, 22 10:34 PM
मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचं गुरुवारी आंदोलन
23 Feb, 22 09:43 PM
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर फडणवीस बोलले
23 Feb, 22 09:18 PM
हमारा दौर आएगा, मलिकांनी केलं ट्विट
नवाब मलिक यांनी ट्विट करुन भाजला इशारा दिला आहे. हमारा दौर आएगा... असे त्यांनी म्हटलंय.
23 Feb, 22 08:57 PM
मलिक यांना 08 दिवसांची ईडी कोठडी
नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ईडीने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने 10 दिवसाची कोठडी दिली आहे.
23 Feb, 22 08:24 PM
नवाब मलिकांनंतर अनिल परब आत जाणार, किरीट सोमय्यांचा दावा
23 Feb, 22 08:13 PM
नवाब मलिक निडर होऊन बोलतात म्हणूनच कारवाई
मंत्री नवाब मलिक मोदी सरकार आणि भाजपा विरोधात निडर होऊन बोलतात म्हणूनच त्यांना लक्ष्य करुन कारवाई करण्यात आल्याचं छगन भुजबळ म्हणाले. मलिकांविरोधात कारवाई का झालीय हे आता संपूर्ण राज्याला आणि देशाला कळालं आहे, असंही ते म्हणाले.
23 Feb, 22 08:09 PM
नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही- छगन भुजबळ
मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही आणि त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मंत्री नारायण राणेंनाही अटक झाली होती. त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
23 Feb, 22 08:07 PM
नवाब मलिकांविरोधातील कारवाईचा निषेध नोंदवला जाणार
नवाब मलिक यांच्या विरोधात सूडबुद्धीनं करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या सकाळी १० वाजता महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि मंत्री मंत्रालयाशेजारी निदर्शनं करणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
23 Feb, 22 07:53 PM
नवाब मलिकांच्या अटकेवर काय म्हणाले अॅड. उज्ज्वल निकम?
23 Feb, 22 07:38 PM
संजय राऊतांचा ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल
23 Feb, 22 07:15 PM
शेवटपर्यंत एकत्र राहून लढा द्यायचा, राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांचा सूर
नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांनी शेवटपर्यंत एकत्र राहून लढा द्यायचा, असा निर्धार केल्याची माहिती समोर आली आहे.
23 Feb, 22 06:59 PM
मलिकांच्या अटकेचा मोहित कंबोज यांच्याकडून जल्लोष
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुंबईत मोहित कंबोज यांच्या घराबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
23 Feb, 22 06:44 PM
नवाब मलिक काही डी-गँगचे सदस्य नाहीत, वकिलांचा कोर्टात दावा
२०२२ मध्ये पिडीतेने जवाब देणे आणि त्यात मला २० वर्षे पूर्वी काय घडले माहित नाही असे सांगणे सोयीचे आहे. १५ वर्षे तुम्हाला भाडे मिळाले नाही, पण पिडीताने त्या बाबतीत काहीही केल्याचे दिसत नाही. तसेच मलिक यांच्या विरोधात कारवाई का? ते काय डी गँगचे सदस्य नाहीत, असा युक्तीवाद मलिकांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.
23 Feb, 22 06:42 PM
मलिकांचा संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाही, वकिलांचा दावा
मुनिराला सलीम पटेल विरुद्ध तक्रार असेल तर या सगळ्यात मालिकांचा संबंध काय आहे? कारण मलिक स्वतःच याप्रकरणात बळी ठरले आहेत. कारण ज्या व्यक्तीकडे मालमत्तेचे अधिकार नव्हते त्यांनी मालिक यांना मालमत्ता विकली, असं मलिक यांचे वकील देसाई यांनी कोर्टात दावा केला आहे.
23 Feb, 22 06:17 PM
नवाब मलिक यांना ईडीने नेमकी कशासाठी अटक केली?
नवाब मलिक यांना ईडीने नेमकी कशासाठी अटक केली? हे आहेत आरोप...क्लिक करा आणि वाचा!
23 Feb, 22 06:08 PM
दाऊदविरुद्धची एफआयआर कुणीही पाहिलेली नाही, मलिकांच्या वकिलांचा दावा
दाऊदविरुद्धची एफआयआर कोणीही पाहिली नाही. गेल्या 30 वर्षांपासून तो या गुन्ह्यांसाठी ओळखला जातो पण एफआयआर 3 फेब्रुवारीलाच नोंदवला जातो.
यापैकी कोणत्याही आरोपांशी मलिक यांचा संबंध जोडणारे काहीही पुरावे नाहीत, नवाब मलिकांच्या वकिलांचा दावा.
23 Feb, 22 06:02 PM
नवाब मलिक यांच्याकडून वकील अमित देसाईंच्या युक्तीवादाला सुरुवात
कोणताही पुरावा ईडीकडे नाही. फक्त उपलब्ध माहितीच्या आधारे मलिक यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आलं. २० वर्षांपूर्वीचं प्रकरण आताच उखरुन काढण्याचं नेमकं कारण काय?, असा सवाल करत अमित देसाई यांनी ईडीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
23 Feb, 22 05:29 PM
"नवाब मलिकांकडून आर्थिक गैरव्यवहार"
नवाब मलिकांकडून कशापद्धतीनं आर्थिक गैरव्यवहार केला जात आहे याची माहिती ईडीचे वकील अनिल सिंह कोर्टासमोर देत आहेत.
23 Feb, 22 05:47 PM
"दाऊदच्या बहीणीनं नवाब मलिकांसोबत आर्थिक व्यवहार केला"
दाऊदची बहीण हसीना पारकर हिनं संबंधित कोट्यवधींच्या जमिनीचा व्यवहार अवघ्या ५५ लाखांमध्ये केला. हा व्यवहार पूर्णपणे रोख करण्यात आला त्याचे कोणतेही बँक रेकॉर्ड ठेवण्यात आले नाहीत, असा दावा ईडीनं कोर्टासमोर केला आहे.
23 Feb, 22 05:42 PM
मुनिरा आणि तिची बहीण जमिनीची मूळ मालक, ईडीचा कोर्टात दावा
मुनिरा आणि तिची बहीण कुर्ला येथील गोवा कंपाऊंड जमिनीचे मूळ मालक आहेत. त्यांना माध्यमांमधून कळालं की त्यांच्या जमिनीची विक्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित कंपनीला विकण्यात आली. मुनिरा आणि तिच्या बहीणीनं ईडीला हा व्यवहार चुकीच्या पद्धतीनं झालेला असल्याची माहिती दिली. सलीम पटेल यानं बेकायदेशीररित्या जमिनीची विक्री केली आणि सलीम पटेल हा १९९३ सालच्या बॉम्बस्फोटाचा आरोपी.
23 Feb, 22 05:37 PM
काँग्रेसचे नेतेही पवारांच्या भेटीला रवाना
नवाब मलिकांना अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
23 Feb, 22 05:29 PM
भाजपाकडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी
नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर भाजपानं मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यांचा राजीनामा घेतला नाही तर राज्यभर आंदोलनं करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
23 Feb, 22 05:21 PM
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सिल्वर ओकवर पोहोचण्यास सुरुवात
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व नेते पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्वर ओकवर पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना
23 Feb, 22 05:08 PM
ईडीनं कोर्टात केला नवाब मलिकांवर गंभीर आरोप
डी-कंपनीच्या एका सदस्याची २०० कोटींची संपत्ती ही नवाब मलिकांच्या कुटुंबातील लोकांच्या नियंत्रणात असल्याचा ईडीचा आरोप
23 Feb, 22 05:06 PM
कुर्ला येथील डी-कंपनीची संपत्ती नवाब मलिकांच्या कुटुंबीयांची
कुर्ला येथील एक संपत्ती जी डी-कंपनीशी संबंधित आहे तिच संपत्ती नवाब मलिकांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपनीच्या मालकीची असल्याचं चौकशी आढळून आल्याचं ईडीनं कोर्टासमोर म्हटलं आहे.
23 Feb, 22 05:05 PM
हसिना पारकर हीच दाऊदची मुख्य हस्तक- ईडी
ईडीच्यावतीनं कोर्टासमोर युक्तीवाद सुरू झाला असून दाऊदची बहीण हसिना पारकर हीच मुख्य हस्तक असून तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा केली गेली.
23 Feb, 22 04:59 PM
नवाब मलिकांच्या अकटेची ऑर्डर
ईडीनं जारी केलेली नवाब मलिक यांच्या अटकेची ऑर्डर...
23 Feb, 22 04:54 PM
मला जबरदस्तीनं कोर्टात आणलं- नवाब मलिक
ईडीनं मला कोणतीही पूर्वकल्पना न देता पहाटे बळजबरीनं इथं आणलं आहे. माझ्याविरोधात कोणत्या अधिकाराखाली कारवाई केली जात आहे याची माहिती देखील देण्यात आलेली नाही, असं नवाब मलिक कोर्टासमोर म्हणाले आहेत.
23 Feb, 22 04:48 PM
नवाब मलिकांना कोर्टासमोर हजर करण्यास उशीर, न्यायाधीश संतापले
आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यास इतका उशीर का होत आहे? असा सवाल उपस्थित करत सेशन कोर्टाचे न्यायाधीश ईडीकडून बाजू मांडणाऱ्या वकिलांना केली विचारणा
23 Feb, 22 04:42 PM
'बरेच जण गोत्यात येणार', अतुल भातखळकरांचं ट्विट
23 Feb, 22 04:37 PM
नवाब मलिक राजीनामा देण्याची शक्यता
राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झालेली असल्यामुळे ते आता आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
23 Feb, 22 04:24 PM
नवाब मलिक कोर्टात पोहोचले
जे.जे.रुग्णालयात वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना सेशन कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांच्याकडून अॅड. अमित देसाई मांडणार बाजू; ईडीकडून मनी लॉन्ड्रींग प्रकरणी कोठडीची मागणी
23 Feb, 22 04:16 PM
संपूर्ण देश पाहातोय- संजय राऊत
ईडी आणि सीबीआयकडून महाराष्ट्र व पश्चिम बंगालमध्ये काय केलं जातंय हे पूर्ण देश पाहात आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग सुरू असून कायदेशीर आणि राजकीय लढाईला आम्ही उत्तर देऊ, असं संजय राऊत म्हणाले.
23 Feb, 22 04:12 PM
मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये बैठक होणार
नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज संध्याकाळी साडेसहा वाजता तातडीची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
23 Feb, 22 04:03 PM
वैद्यकीय तपासाणीसाठी जे.जे.रुग्णालयात रवाना
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीकडून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
23 Feb, 22 04:01 PM
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. आज पहाटे पाच वाजताच ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात आणून त्यांच्या चौकशीला सुरुवात केली होती. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक केली आहे.