Maharashtra MLC Election: मोठी बातमी! विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 08:12 PM2022-12-29T20:12:53+5:302022-12-29T20:14:02+5:30

Maharashtra MLC Election: राज्यातील 2 पदवीधर आणि 3 शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Maharashtra MLC Election: Election of Vidhan Parishad teachers and graduates constituencies announced | Maharashtra MLC Election: मोठी बातमी! विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

Maharashtra MLC Election: मोठी बातमी! विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

googlenewsNext

Maharashtra MLC Election: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे बिगुल वाजले आहे. राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून 30 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर, 2 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागेल.

राज्यातील 2 पदवीधर आणि 3 शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर, 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. 

विद्यमान सदस्य

  • नाशिक पदवीधर- सुधीर तांबे(काँग्रेस )
  • अमरावती पदवीधर- रणजीत पाटील(भाजप)
  • औरंगाबाद शिक्षक- विक्रम काळे(राष्ट्रवादी)
  • कोकण शिक्षक- बाळाराम पाटील(अपक्ष)
  • नागपूर शिक्षक- नागो गाणार(अपक्ष) 

Web Title: Maharashtra MLC Election: Election of Vidhan Parishad teachers and graduates constituencies announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.