Maharashtra MLC Election: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे बिगुल वाजले आहे. राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून 30 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर, 2 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागेल.
राज्यातील 2 पदवीधर आणि 3 शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर, 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल.
विद्यमान सदस्य
- नाशिक पदवीधर- सुधीर तांबे(काँग्रेस )
- अमरावती पदवीधर- रणजीत पाटील(भाजप)
- औरंगाबाद शिक्षक- विक्रम काळे(राष्ट्रवादी)
- कोकण शिक्षक- बाळाराम पाटील(अपक्ष)
- नागपूर शिक्षक- नागो गाणार(अपक्ष)