Maharashtra Monsoon Session LIVE: विधानसभेचे दिवसभराचे कामकाज स्थगित, सोमवारी सकाळी ११ वाजता नियमित बैठक

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 08:26 AM2023-07-17T08:26:06+5:302023-07-17T11:40:46+5:30

Maharashtra Monsoon Assembly Session 2023 Pavsali Adhiveshan Live updates: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू झालं असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. 

Maharashtra monsoon assembly session 2023 Pavsali Adhiveshan Live updates | Maharashtra Monsoon Session LIVE: विधानसभेचे दिवसभराचे कामकाज स्थगित, सोमवारी सकाळी ११ वाजता नियमित बैठक

Maharashtra Monsoon Session LIVE: विधानसभेचे दिवसभराचे कामकाज स्थगित, सोमवारी सकाळी ११ वाजता नियमित बैठक

googlenewsNext

आज राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा पावचा दिवस आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू झालं असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.

LIVE

Get Latest Updates

06:28 PM

विधानसभेचे कामकाज स्थगित

पावसाळी अधिवेशनातील विधानसभेची शुक्रवारची कामकाज बैठक स्थगित झाली असून, आता सोमवार, २४ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सभागृहाची बैठक भरेल,  असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

05:24 PM

शरद पवारांच्या आशिर्वादामुळे जितेंद्र आव्हाड मंत्री: कालिदास कोळंबकर

विधानसभेत कामकाजादरम्यान गृहनिर्माण विभागाच्या एका जीआरसंदर्भात चर्चा सुरू असताना, शरद पवार यांच्या आशिर्वादामुळे जितेंद्र आव्हाड मंत्री झाले. तेव्हा त्यांना बीडीडी चाळीसंदर्भात किमती कमी करण्यासाठी सूचना केल्या होता, त्या  त्यांनी मान्य केल्या नाहीत. नवीन सरकार आल्यावर ५० लाखाचे २५ लाख करण्यात आले, असे सांगत कालिदास कोळंबकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

04:11 PM

गावाला लाइट नाही, रस्ता नाही, ही गंभीर बाब: नाना पटोले 

आम्ही सगळे सरकारसोबत आहोत. याबाबतीत राजकारण करण्याचे काम नाही. महागाईच्या काळात ५ लाख रुपये कमी आहेत. १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. तेथील युवकांना, तरुणांना पुन्हा उभे करण्याचे काम करायला हवे. प्रगत महाराष्ट्रात मुंबई, ठाण्याजवळ असलेल्या या गावांमध्ये लाइट नाही, रस्ता नाही, यंत्रणा पोहोचू शकत नाही, ही गंभीर बाब आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
 

04:07 PM

निसर्ग आपल्यापेक्षा मोठा आहे: नाना पटोले

इर्शाळवाडी घटनास्थळी जाऊन आलो. गाडगीळ समितीबाबत गांभीर्याने सरकारने विचार करावा. रेल्वेचे काम सुरू आहे. स्फोटके लावली जातात, अशी माहिती तिथे दिली. हे एक कारण या घटनेला जबाबदार आहे का, अशी शंका उपस्थित करण्यात आली. विकासाच्या नावाखाली अशा घटना होणे योग्य नाही, अशा भावना आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

04:01 PM

११९ जणांना वाचवण्यात यश मिळाले: मुख्यमंत्री

इर्शाळवाडी येथील मृतांबाबत संवेदना आहे. सरकार आणि प्रशासन दुर्घटनाग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

03:57 PM

सिडकोला पुनर्वसनाचे काम करण्यास सांगणार आहोत: मुख्यमंत्री

या भागाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित केली जात आहे. जागा निश्चित केली की सिडकोला तत्काळ काम सुरू करण्यास सांगणार आहोत. तशी प्रक्रिया लवकरच रावबली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
 

03:55 PM

सर्व यंत्रणा उपलब्ध असून वापरू शकलो नाही ही खंत: मुख्यमंत्री

आपल्याकडे सर्व यंत्रणा उपलब्ध असून ती आपण वापरू शकलो नाही. रेस्क्यू टीम, NDRF च्या टीमचे काम कौतुकास्पद आहे. आपला जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचवणे ही बाब वाखाडण्यासारखी आहे. अनेक सोयी त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. आज दुसऱ्या दिवशीही बचावकार्य, मदत, पुनर्वसनाचे काम सुरू आहे. कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यावर भर देणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

03:53 PM

गिरीश महाजन यांचे कौतुक: मुख्यमंत्री

रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या सर्वांना धीर दिला. मदत केली. दिवसभर तिथे राहून बचावकार्याची व्यवस्था पाहिली. याबाबत गिरीश महाजनांचे कौतुक करायला हवे. सामान घेऊन जाणाऱ्यांना सॅल्यूट करायला हवे, असे मुख्यमंत्री एकनाथ शइंदे म्हणाले.

03:50 PM

अनेकांनी मोलाची कामगिरी बजावली: मुख्यमंत्री

NDRF ४ टीम, अन्य अनेक पथके, स्वयंसेवी संस्था, रेस्क्यू टीम यांनी मोलाची कामगिरी बजावली. गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत तत्काळ घटनास्थळी धावले. ३ वाजता गिरीश महाजन हे प्रत्यक्ष घटना घडली तिथे पोहोचले. अदिती तटकरे, अनिल पाटील हेही पोहोचले.

03:49 PM

दुर्गम भाग, वादळवारा, पाऊस परिस्थिती यांमुळे परिस्थिती कठीण: मुख्यमंत्री

प्रशासकीय यंत्रणेमार्फत बचाव कार्यासाठी तत्काळ पोहोचले होते. दुर्गम भाग, वादळवारा, पाऊस परिस्थिती कठीण होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही रात्रीपासून संपर्कात होते. मी सकाळी पोहोचलो.

03:47 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवेदन

रायगडमधील चौक येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन केले. रात्री ११.३५ वाजता पहिली माहिती मिळाली. रात्री १२.४० सुमारास पहिली यंत्रणा पोहोचली.

02:58 PM

आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात; केला गंभीर आरोप

 मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बाजार समिती आणि शिक्षण समितीच्या केबिन पालिका प्रशासनाने पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. शिंदे सरकारच्या आदेशाने महापालिका प्रशासनान मुंबईच्या पालकमंत्र्यांना स्वतंत्र केबिन दिल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाचा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय.

02:05 PM

शाळा परिसरात गाड्या उभ्या करून गॅरेजही चालवले जातेय; रवींद्र वायकर यांचा आरोप

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड १५० फुटाचा झालेला आहे. या परिसरात ३ शाळा असून याच परिसरात दुकानांमध्ये मोटर पार्टस विकले जातात. शाळा परिसरात गाड्या उभ्या करून गॅरेजही चालवले जाते, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी सभागृहात केला. 

02:05 PM

खारघर दुर्घटनेचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित; सत्ताधारी अन् विरोधकांची जुंपली

आमदार कपिल पाटील यांनी मृत श्री सदस्यांच्या नातेवाईकांना धर्माधिकारी कुटुंबियांनी किती मदत केली असा सवाल विचारला. यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, मृत श्री सदस्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत धर्माधिकारी कुटुंबियांनी केली आहे. डॉक्टरांची मोठी व्यवस्था होती तर मग खाजगी हॅास्पिटलमध्ये त्यांना का अॅडमिट केले असा सवाल आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला विचारला, यावरुन सत्ताधारी अन् विरोधकांची जुंपल्याचे पाहायला मिळाले.

02:02 PM

जयंत पाटील सभागृहात नेमकं काय म्हणाले?, पाहा

01:57 PM

मणिपूरमधील घटना ही अतिशय  निंदनीय- संजय शिरसाट

विरोधक कशावरही सभात्याग करतात. मणिपूरमधील घटना ही अतिशय  निंदनीय आहे. एक निषेधाचा ठराव स्वीकारला असता तर झालं असतं. त्यासाठी सभात्याग करुन कामकाज थांबवणं, हे चुकीचं आहे. सर्व सामान्यांचे प्रश्न न मांडता सभात्याग करणं योग्य नाही, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.

01:48 PM

मंगलप्रभात लोढा यांनी महानगरपालिकेत स्वत:चं दालन सुरु केल; जयंत पाटलांनी घेतला आक्षेप

मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत स्वतःचं दालन सुरु केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात आक्षेप घेतला. स्वतःचं दालन सुरु करणं हे महापालिकेच्या अधिकारांवर गदा आणणारं ठरू शकतं, असं जयंत पाटील यांनी सांगितले.

01:17 PM

नवी मुंबई विमानतळ पुढील वर्षी सुरु होईल; देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती

नवी मुंबई विमानतळ पुढील वर्षी सुरु होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिली. 

12:40 PM

लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरु आहे; सुनील प्रभू यांचा आरोप

मणिपूरच्या घटनेबाबत विरोधकांना बोलू न देणं म्हणजे लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरु आहे, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे.

12:33 PM

एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल

काल दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमधील इर्शाळवाडीत घडलेल्या ठिकाणी उपस्थित होते. तिकडून काल रात्री परतल्यानंतर एकनाथ शिंदे हे आज विधानभवनात दाखल झाले. यावेळी वाटेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. त्यांनी देखील एकनाथ शिंदे भेटल्याचे दिसून आले. 

12:22 PM

मणिपूरमधील घटना अतिशय निंदनीय- प्रणिती शिंदे

अंगावर काटा येईल अशी घटना मणिपूरमध्ये घडली आहे. मणिपूरमधील घटनेचा जाहीर निषेध आहे. गेले ८० दिवस मणिपूर मधील लोकांवर अन्याय अत्याचार होत आहे. आम्ही आज २ मिनीट मागितली तर अध्यक्षांनी आम्हाला बोलण्यासाठी नकार दिला. इतक्या गंभीर विषयावर आम्हाला बोलू दिले नाही. यावरुन भाजपा सरकारला गांभीर्य नसल्याचं दिसुन येत आहे. 

11:51 AM

मणिपूरच्या घटनेनंतर भाजपाचा खरा चेहरा समोर आला- भास्कर जाधव

मणिपूरच्या घटनेनंतर संपुर्ण देशाची मान शर्मेने खाली गेलेली आहे. एका बाजुला भाजपचे लोक आम्ही विश्वगुरु म्हणुन बडाया मारतात आणि दुसऱ्या बाजुला याच देशामध्ये महिलांची किती विटंबना होत आहे. मणिपूरची घटना ही ४ मे रोजी घडली आणि काल २० जुलै रोजी संपुर्ण देशाला समजली. २० जुलैपर्यंत ही घटना लपून राहिली. या देशामध्ये अशा अजुन किती भयानक घटना घडत आहेत आणि त्या सत्ताधिशांच्या दहशतीखाली लपल्या जात आहेत किंवा लपवल्या जात आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केली.

11:22 AM

मणिपूरमधील घटनेवरुन विरोधकांनी केला सभात्याग

मणिपूरमधील घडलेल्या घटनेवरुन विधानसभेचे अध्यक्ष आम्हाला बोलू देत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी निषेध करत सभात्याग केला. 

11:08 AM

विधानसभेच्या आजच्या कामकाजाला सुरुवात

विधानसभेच्या आजच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.

11:00 AM

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; अधिवेशनाचा आज पाचवा दिवस

आज पावसाळी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. आजही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मणिपूरमधील घटनेवरुन केंद्र सरकारचा निषेध केला. उलट्या काळजाच्या आणि थंड रक्त असलेल्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

10:40 AM

विधानपरिषदेच्या आजच्या कामकाजाला सुरुवात

विधानपरिषदेच्या आजच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.

10:38 AM

आशिष शेलार अन् वर्षा गायकवाड यांची विधानभवनात एकत्र एन्ट्री

भाजपाचे आमदार आशिष शेलार आणि काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड हे दोघेही आज एकत्र विधानभवनात दाखल झाले.

04:37 PM

तुमचे भाषण ऐकले तेव्हा असे वाटले की तुम्ही थेट शेतातूनच इथे आलात - मुंडे

सुनीलभाऊ तुमचे भाषण ऐकले तेव्हा असे वाटले की तुम्ही थेट शेतातूनच इथे आलात. ७८ लाख शेतकऱ्यांचे ६५० कोटी नाही तर ७८ लाख रुपये भरले गेले आहेत. ३१जुलैपर्यंत लाभ घेता येणार. रोज सहा ते सात लाख शेतकरी विमा घेतायत. - धनंजय मुंडे

03:57 PM

कोण म्हणतेय मुंबईत शेतकरी नाहीत; शेतीचीच सात बेटे होती, आता सिमेंटचे डोंगर उभे आहेत. - मनीषा चौधरी

कोण म्हणतेय मुंबईत शेतकरी नाहीत; शेतीचीच सात बेटे होती, तिथे शेती होत होती. आता सिमेंटचे डोंगर उभे आहेत. पालघरमध्ये  चिकू उत्पादन घेतले जाते. परंतू, त्यावर रोग पडू लागले आहेत. आघाडी सरकारने पालघरच्या शेतकऱ्यांवर अन्याय केला. रिलायन्सला तीन वर्षांचे विम्याचे कंत्राट दिले. चिकु बागायतदारांना हेक्टरी १८ हजार रुपये विम्यासाठी द्यावे लागतात. सरकार भरते. विमा साठ हजाराचा आणि त्यासाठी सरकार ५१ हजार रुपये भरते. मग ९ हजार रुपयांसाठी एवढे पैसे कशासाठी - मनीषा चौधरी

03:38 PM

रायगड सारख्या घटना भविष्यात होऊ नये यासाठी विधीमंडळात सुचना करण्यात आल्या - वर्षा गायकवाड

रायगड येथील खालापुरमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे, असे शासनाने सांगितले. अशा घटना भविष्यामध्ये होऊ नये याविषयीच्या सूचना विधीमंडळात करण्यात आल्या आहेत. - वर्षा गायकवाड

03:26 PM

तेलंगाना राज्यातील चोरबीटीच्या बियाण्याला मान्यता द्या- सुभाष धोटे

तेलंगाना राज्यामधून चोरबीटीचे बियाणे येते, उगवन शक्ती चांगली आहे. तिकडे त्याला मान्यता आहे. दोन किमीचेच अंतर आहे. त्या बियाण्याला एकतर मान्यता द्या किंवा बंदी आणा. - सुभाष धोटे

03:14 PM

इर्शाळवाडीसारख्या घटना टाळता येतील, कोकणातील डोंगररांगांत बांबुची लागवड करावी - शेखर निकम

कोकणातील धरणे गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहेत. कोकणातील डोंगररांगांत बांबुची लागवड करावी जेणेकरून इर्शाळवाडीसारख्या घटना टाळता येतील. दापोली कृषीविद्यापीठाला २५ कोटी रुपये देण्यात आले, परंतू ते ट्रेझरी बंद झाल्याने परत आलेले. ते आणि आणखी २५ कोटी रुपये द्यावेत.  - शेखर निकम

02:22 PM

सचिन अहिर यांचा कंत्राट पद्धतीवर काम करणाऱ्यांबाबत उपस्थित केला सवाल

क्लास ४ परिचारक सरळ सेवेतून होणाऱ्या भरतीअंतर्गत वर्षानुवर्षे कंत्राट पद्धतीवर काम करणाऱ्यांचा देखील समावेश होणार आहे का?, असा सवाल ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.

02:11 PM

रायगड दुर्घटनेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली माहिती

इर्शाळवाडीच्या पायथ्याला वैद्यकीय पथकं, रुग्णवाहिकांसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तत्काळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.

02:07 PM

इर्शाळवाडीची घटना अतिशय दुःखद- अशोक चव्हाण

इर्शाळवाडीची घटना अतिशय दुःखद आहे. यापूर्वी माळीणच्या रूपात महाराष्ट्राने संपूर्ण गावच्या गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जाण्याची दुर्दैवी घटना अनुभवलेली आहे. आज संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला असून, कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे जी गावे डोंगरांवर किंवा पायथ्याशी आहेत, अशा गावांच्या बाबतीत शासनाने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, असं काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.

01:22 PM

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन नाना पटोले आक्रमक

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली. पीक विमा योजना, कर्ज वाटप, जास्त पुरवठा कसा करता येईल, यावरुन काही प्रश्न उपस्थित केले. दर १० तासांत शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे, हे खूप भयानक आहे. त्यामुळे शासनाने यावर तातडीने विचार करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

12:45 PM

मुंबईत अनेक धोकादायक इमारती; अस्लम शेख यांनी सभागृहात प्रश्न केला उपस्थित

मुंबईत सध्या अनेक धोकादायक इमारती आहेत. आता जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गजर असल्याचं काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी सांगितले. 

12:15 PM

मुख्यमंत्री स्वत: घटनास्थळी, जो काही निर्णय घ्यायचा तो मुख्यमंत्री घेतील- भरत गोगावले

पावसाळी अधिवेशन मधील प्रश्नांउत्तराचा तास झालेला आहे. आता रायगडमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही जात आहोत. मुख्यमंत्री स्वत: घटनास्थळी असल्याने जे काही निर्णय असेल तो मुख्यमंत्री घोषित करतील, असं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले. 
 

11:55 AM

आप्पासाहेब धर्माधिकारींच्या सन्मान कार्यक्रमातील मृत्यूप्रकरणी विरोधक आक्रमक

खारघरमधील आप्पासाहेब धर्माधिकारींच्या सन्मान कार्यक्रमात झालेल्या नागरिकांचा मृत्यू आणि कार्यक्रमातील व्यवस्था यावरून महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात खडाजंगी पाहायला मिळाली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून राजकारण होत असल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले. यावेळी राज्य सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. 

11:42 AM

जो एका महिन्यात पाऊस होतो, तो आता तीन दिवसात होतो- देवेंद्र फडणवीस

सध्या वादळाचे आणि पावसाचे पॅटर्न बदलले आहेत. जो एका महिन्यात पाऊस होतो, तो आता तीन दिवसात होतो. त्यामुळे यावर तसा विचार करुन उपाययोजनेबाबत चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
 

11:20 AM

अशोक चव्हाण यांची राज्य सरकारला सूचना

डोंगरावरील किंवा पायथ्याशी असलेल्या गावांची सरकारने काळजी घ्यावी. विशषत: कोकणात अशी जास्त गावं आहेत. अशा दुर्घटनेवेळी सत्ताधारी आणि विरोधक असं काहीही नसतं. बचावकार्य जोरदार सुरु आहे, याची आम्हाला कल्पना आहे, असं काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

11:13 AM

बेपत्ता लोकांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश; देवेंद्र फडणवीसांची माहिती

दरड कोसळल्यामुळे २५ ते २८ कुटुंबं बाधित झाले आहेत. बेपत्ता लोकांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. जखमींवर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 

11:08 AM

रायगडमधील दुर्घटनेची देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली माहिती

आज राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. रायगडमधील इर्शाळवाडी इथं दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेची निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलं. आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून ९८ जणांचा वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

05:38 PM

विधीमंडळाचे आजच्या दिवसाचे कामकाज स्थगित

मराठावाडा मुक्ती संग्रामाबाबचा प्रस्ताव एकमताने संमत झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज गुरूवारपर्यंत स्थगित करण्यात आले.
 

05:21 PM

मराठावाडा मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम PM मोदींच्या उपस्थितीत व्हावा- राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास संपूर्ण देशाला माहित व्हावा, या दृष्टीने अमृत महोत्सवी मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात येत आहे. या दिवशीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करावे, अशी विनंती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.

02:25 PM

उद्धव ठाकरेंनी विधानभवन परिसरातून पत्रकारांशी संवाद साधला

02:05 PM

उद्धव ठाकरे अन् अजित पवार यांनी विधानभवनात भेट; चर्चांना उधाण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत राज्यासाठी चांगलं काम करा, पावसाळी सुरु आहे, शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, असं अजित पवारांना सांगितल्याचं उद्धव ठाकरेंनी भेटीनंतर सांगितले. 

02:01 PM

तलाठी भरतीची मुदत आणखी वाढवा; रोहित पवारांची विधानसभेत मागणी

राज्यात काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या भरती प्रकियेला सुरूवात झाली असून भूमी अभिलेख विभागामार्फत तलाठी पदांसाठी ४६४४ जागांवर भरती निघाली आहे. या भरतीसाठी सोमवारपर्यंत दहा लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जुलै होती, पण शासनाने ती एक दिवस वाढवून भरती प्रकियेत असलेल्या उमदेवारांना दिलासा दिला होता. त्यानुसार, १८ जुलैपर्यंत ही डेडलाईन ठेवण्यात आली होती. मात्र, आमदार रोहित पवार यांनी भरतीसाठीची मुदत आणखी वाढवावी, अशी मागणी विधानसभेत केली आहे. 

01:59 PM

सरकार शेतकरी विरोधी असल्याने आम्ही सभात्याग करण्याचा निर्णय घेतला- नाना पटोले

राज्यातले सरकार हे शेतकरी विरोधी आहे. हे आज सगळ्या महाराष्ट्राने आपण पाहिलं आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. सरकार बेशरम आहे. गेंड्याच्या कातड्यापेक्षा जाड झालेली कातडी यांची आहे, अशी टीका काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली. 

01:37 PM

कृषीमंत्री नवीन असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अभ्यास सुरु झालेला नाही- बाळासाहेब थोरात

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचा विषय असतो. म्हणून सभागृहात आम्ही ते प्रश्न मांडत असतो. बोगस बियाणांचे खत शेतकऱ्यांना मिळत नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसेच कृषीमंत्री नवीन असल्याने त्यांचा अजून अभ्यास सुरु झालेला नाही, असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना लगावला.

01:08 PM

देवेंद्र फडणवीस अन् भास्कर जाधव यांच्यात जुंपली

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. प्रश्नोत्तराचा तास संपता संपता फडणवीस व भास्कर जाधवांमध्ये जुंपली. प्रश्नोत्तराचा तास संपताना भास्कर जाधवांनी आपल्याला ठरवून बोलण्याची संधी दिली जात नाही, असा थेट आरोप विधानसभा अध्यक्षांवर केला. यावरून देवेंद्र फडणवीसांनी लागलीच भास्कर जाधवांच्या विधानावर आक्षेप घेतला.

01:08 PM

बोगस बियाणावरुन विरोधक आक्रमक; बीटी कॉटन प्रमाणे कारवाई केली जाणार- धनंजय मुंडे

बोगस बियाणांच्या संदर्भात अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, बोगस बियाणांच्या संदर्भात 1966 चा कायदा आहे. बीटी कॉटनचा कायदा आला. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक होते हे मी मान्य करतो, पण आता त्यासाठी आपण कायदा आणत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. बोगस बीयाणांच्या बाबतीत कारवाई करण्यासाठी समिती कठीण केलेली आहे. आता बीटी कॉटन प्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

12:38 PM

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांचा सभात्याग

खतांच्या किमती आहेत त्यावर सुद्धा उत्तर आलं नाही. खताच्या किमती स्थिर नाहीत. नफेखोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. राज्यात कर्जमाफीसुद्धा झाली नाही. सरकारने शेतकऱ्यांवर आणि खरिप हंगामावर पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्ही सभात्याग केला, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

12:37 PM

बोगस खत-बियाणे विकणाऱ्यावर कारवाई होणार - अजित पवार 

खतांबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. केंद्राने खताच्या किंमतींवर नियंत्रण राहावे म्हणून एक लाख कोटी अनुदान दिले. १६४ मेट्रिक टन साठा बियाणे जप्त केले आहेत. गेल्या कॅबिनेटमध्ये कमिटी केली. या अधिवेशनात कायदा आणला जाईल. बोगस खत-बियाणे विकणाऱ्यावर कारवाई होणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

12:22 PM

खतांच्या किमतीवरुन विजय वडेट्टीवर आणि धनंजय मुंडे आमने-सामने 

महाराष्ट्र पावसाळी अधिवेशना आज तिसरा दिवस आहे. आज खतांच्या किमतीवरुन विजय वडेट्टीवर आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे आमने-सामने आले. यावेळी दोघेही आक्रमक पाहायला मिळाले. 

11:22 AM

विरोधकांना निधी का मिळत नाही? यशोमती ठाकूर

कुशलच्या निधीवर सभागृहात गोंधळ सुरू आहे. विरोधकांना निधी का मिळत नाही, असा सवाल आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला.

11:15 AM

रोहित पवारांची सरकारवर टीका

कोकण आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. पण, राज्यातील 21 जिल्ह्यात अद्याप पाऊस झाला नाही. याकडे सरकारचे लक्ष नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री देखील दिसत नाहीत, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

10:52 AM

विधानभवानच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधानभवानच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या सरकाचा धिक्कार असो, सोमय्या यांना सुरक्षा देणाऱ्या सरकारच्या धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधक आंदोलन करत आहेत. 

10:22 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात दाखल

आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात दाखल झाले आहेत.

09:34 AM

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. काल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ व्हायरल प्रकरणी विरोधकांनी दोन्ही सभागृहात आवाज उठवला होता. किरीट सोमय्यांवर कारवाई करा, त्यांची सुरक्षा काढून टाका, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन कारवाई केली जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

06:15 PM

आपल्या दुष्काळी भागातील पाणी दुसऱ्या भागाला देणारे मंत्री पाहिलेत; जयकुमार गोरेंचा टोला

तो नेता आता सभागृहाचा सदस्य नसल्याने मी नाव घेऊ शकत नाही. मला सभागृहाला तसे कळवावे लागेल. परंतू, आज माझ्या दुष्काळी भागाला पाणी कसे नेता येईल यासाठी सरकार काम करतेय. माझ्या मतदारसंघात ११२ गावांना पाणी पुरवठा होत आहे. - 
 

04:12 PM

मी आणि विजय देशमुख चहा पिऊन आलो, आत येऊन त्यांनी ही मागणी केली- भास्कर जाधव

महिला अत्याचार प्रकरणात नाव घेतल्या प्रकरणी मला समज द्या असे विजय देशमुख म्हणाले. तेव्हा मी इथे नव्हतो. परंत, जेव्हा आलो तेव्हा मला समजले. मी बाहेर जाऊन व्हिडीओ पाहिला. मी त्या व्हिडीओमध्ये आमदार विजय देशमुख, भाजपाचे आमदार, मंत्री विजय देशमुख असे कुठेही बोललेलो नाही. मी बाहेर बोलून जेव्हा आत आलो तेव्हा देशमुखांनी माझ्या निदर्शनास आणले होते. आम्ही बाहेर गेलो, तेव्हा चहा पिताना त्यांना त्याबाबत सांगितले होते. परंतू, आतमध्ये येऊन त्यांनी ही मागणी केली आहे. मी त्यांची कुठलीही बदनामी केलेली नाही, असे त्यांना सांगितले होते. तसेच मिडीयामध्ये बोलण्यासाठी तुम्ही मीडियावाल्यांनाच मला विचारयला सांगावे असे सांगितले होते. मी जे म्हणालेलो ते विजय देशमुख कोण हे त्यांनी मला विचारले तर मी त्यांना सांगेन, असेही सांगितले होते, असे भास्कर जाधव म्हणाले. 

03:23 PM

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार होते.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार होते. परंतू, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईतील, कोकणातील  मंत्री शेती प्रश्न काय जाणून घेणार, अशा शब्दांत थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. 
यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तुमचे प्रश्न ऐकण्याची जबाबदारी आमच्यावर दिली आहे. मंत्री उपस्थित आहेत. तुम्ही आंब्याविषयी सांगू शकता काय? बोंडू काजूच्या खाली असतो की वर? हे सांगू शकता का, असा सवाल करत सभागृहात प्रश्न मांडण्याची विनंती केली. 

03:12 PM

हिवाळी अधिवेशन ते पावसाळी अधिवेशन यात बरेच काही घडून गेले आहे.

'आता सभागृहात येण्याची इच्छा नाही'; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पाया पडणारे भास्कर जाधव आले

 

02:53 PM

माझ्य़ा नावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न, भास्कर जाधव यांना समज देण्यात यावी - विजय देशमुख

भास्कर जाधव यांनी सकाळी विधानसभेच्या आवारात मीडियाला राज्यातील महिला अत्याचारावर व सोलापूरमधील घटनेचा उल्लेख करत असताना सोलापूरमधील विजय देशमुख असा नामोल्लेख केला. या दोन्ही घटनांशी माझा संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करून भाजपाचा आमदार म्हणून माझ्या नावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. राज्यातील जनतेसमोर नाहक बदनामी केली आहे. भास्कर जाधव यांना समज देण्यात यावी, पुन्हा मिडीयाला मुलाखत देऊन खुलासा करण्यास सांगावे, समज देण्यात यावी, अशी मागणी विजय देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. 

02:07 PM

'कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, प्रकरणाची चौकशी करणार; व्हिडीओ प्रकरणी फडणवीसांची माहिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला विषय नक्कीच गंभीर आहे. आपल्याकडे काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी आमच्याकडे द्या. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. किरीट सोमय्या यांनीही चौकशीची मागणी केली आहे आणि विरोधी पक्षांनीही मागणी केली आहे. याप्रमाणे संपूर्ण चौकशी केली जाणार आहे, असंही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.   

02:07 PM

सुनावणी पूर्ण होईपर्यंत नीलम गोऱ्हेंना पदावर बसण्याचा अधिकार; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

नीलम गोऱ्हे ओरिजनल पार्टीमध्येच आहेत. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केलेलं नाही. सुनावणी पूर्ण होईपर्यंत नीलम गोऱ्हेंना पदावर बसण्याचा अधिकार आहे. त्यांना पदावरुन हटवता येणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

02:02 PM

गृहमंत्र्यांनी तात्काळ किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढावी- अनिल परब

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढण्याची मागणी केली आहे. सोमय्यांनी आज जे पत्र दिलं आहे त्यामध्ये त्यांनी हा व्हिडीओ खोटा आहे असं कुठेही म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं आहे की मी कुणावर अत्याचार केला नाही याचा अर्थ हा व्हिडीओ खरा आहे. तात्काळ गृहमंत्र्यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढावी, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

01:53 PM

तुम्ही दिलेला पेनड्राईव्ह पाहणं माझ्यासाठी फार कठीण परीक्षा- नीलम गोऱ्हे

तुम्ही पेन ड्राईव्ह मला दिला आहे, तो बघणं म्हणजे माझ्यासाठी फार कठीण परीक्षा आहे. पण मी त्यामध्ये महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर या मान्यवराना ते बघायला सांगेन. तसेच सदर महिलेची तक्रार आली पाहिजे, असं विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या. 

01:50 PM

पानवाले हेच अंमली पदार्थ विक्रीसाठी प्रमुख स्त्रोत; जितेंद्र आव्हाड यांचा दावा

पानवाल्याची दुकाने रात्री ११ वाजताच बंद करा, पानवाले हेच अंमली पदार्थ विक्रीसाठी प्रमुख स्त्रोत आहेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

01:29 PM

किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडिओचा सभागृहात पेन ड्राईव्ह; चौकशी करा, विरोधकांची मागणी

राज्य सरकारने किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. महिलांच्या मजबूरीचा फायदा घेतला. जवळपास ८ तासांचे व्हिडिओ आहे. सदर व्हिडिओचा पेन ड्राईव्ह अंबादास दानवे यांनी सभागृहात दाखवला. यावर तुमच्याकडे काही तक्रारी असतील तर पाठवा, त्यावर योग्य ती चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

01:01 PM

चर्नी रोड प्रकरण: वसतिगृहाच्या महिला अधिक्षक निलंबित; राज्य सरकारची अधिवेशनात माहिती

मुंबईतल्या चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या १८ वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी वसतिगृहाच्या महिला अधिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच मागील १ वर्षांपासून वसतीगृहातील सीसीटीव्ही कार्यरत नव्हते, सीसीटीव्ही सुरु असते तर पीडित तरुणीचा जीव वाचला असता, असंही समोर आलं आहे.

12:24 PM

कंट्रोल डिलेव्हरी चेनचे अधिकार द्या; अंमली पदार्थाविरोधात राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

राज्यातील अनेक तरुण मुले अंमली पदार्थाच्या आहारी जाताय. यासाठी राज्य सरकारने काही धोरण निश्चित करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देत अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केल्याचं सांगितले. तसेच अंमली पदार्थासाठी कोड भाषा वापरली जाते. यासाठी कुरिअरचा देखील वापर करण्यात येतंय. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची या विषयाबाबत चर्चा झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली. यामध्ये एक स्ट्रेटेजी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला याबाबत तीन सूचना देण्यात आल्या. कंट्रोल डिलेव्हरी चेनचे अधिकार राज्य शासनाला देण्यात यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. सध्या कंट्रोल चेनचे अधिकार एनसीबीकडे आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

11:55 AM

मुंबईतील रुग्णालयाचे फायर ऑडिट होणे आवश्यक; सभागृहात चर्चा

मुंबईतील राज्य शासनाचे आणि मुंबई महानगरपालिकेच्या अनेक रुग्णालयाची दयनीय अवस्था आहे. रुग्णांना अजूनही बाहेरुन औषधे घ्यायला लागत आहे. त्यामुळे मुंबईतील राज्य शासनाचे आणि मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयाचे फायर ऑडिट होणे आवश्यक आहे, अशी मागणी राम कदम यांनी केली. यावर मंत्री उदय सामंत यांनी आगामी ९० दिवसांत सर्व ऑडिट पूर्ण होईल, असं आश्वासन दिलं. 
 

11:46 AM

संजय राऊतांच्या बाजूला बसणाऱ्या गुन्हेगारांचं काय?; नितेश राणेंचा सवाल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊतांच्या बाजूला बसणारा पराडकर कोण आहे?, त्यांच्यावर पोलीस स्थानकात अनेक गुन्हे दाखल आहेत, असा दावा नितेश राणेंनी केला आहे. संजय राऊतांच्या बाजूला बसणाऱ्या गुन्हेगारांचं काय?, असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. 

11:43 AM

बार्टी प्रश्नावरुन विरोधक आक्रमक; सभात्याग करण्याचा निर्णय

बार्टी प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. 

11:16 AM

मुंबईतील पाणी तुंबण्यावरुन सभागृहात चर्चा

मुंबईतील पाणी तुंबण्यावरुन सभागृहात चर्चा सुरु आहे. नाना पटोले, आशिष शेलार, अमित साटम यांनी प्रश्न उपस्थित केले. 

11:05 AM

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. 

10:57 AM

महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे; नाना पटोले यांनी मांडली भूमिका

महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि ही कॉंग्रसची भूमिका आहे, असल्याची भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितली.

10:46 AM

विधिमंडळ परिसरात विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी; आव्हाड, देशमुखही सहभागी

आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विरोधकांनी आजही विधानभवनाच्या पायऱ्यावर सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. काल राष्ट्रवादीचे कोणतेही आमदार विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झाले नव्हते. मात्र आज जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनिल देशमुख, शशिकांत शिंदे यांनी विरोधकांच्या आंदोलनात सहभाग घेतला. 

10:08 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळात दाखल

मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळात दाखल झाले.

09:25 AM

रोहित पवार यांचं ट्विट; फॉक्सकॉन प्रकरणी सवाल उपस्थित करत राज्य सरकारवर निशाणा

फॉक्सकॉन कंपनी कर्नाटकात ८८०० कोटींचा नवा प्लांट उभारत असून इथं नव्याने १५००० लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. कर्नाटक सरकारच्या यशस्वी प्रयत्नांनी ‘डबल-ट्रिपल इंजिनचं सरकार’ म्हणवल्या जाणाऱ्या राज्यालाही मागं टाकत हे ‘डबल-ट्रिपल इंजिन’ म्हणजे केवळ ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’ असल्याचं सिद्ध केलं. असो! महाराष्ट्र सरकारही युवांना रोजगार मिळावा म्हणून वेळात वेळ काढून गुंतवणूक आणण्यासाठी कर्नाटकप्रमाणे प्रयत्न करेल, अशी आशा करूयात, असं ट्विट रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

08:49 AM

ज्येष्ठांना गुंगारा देत काँग्रेस आमदारांची संग्राम थोपटेंसाठी मोहीम

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची नावे चर्चेत असताना काँग्रेसच्या तरुणतुर्क आमदारांनी ज्येष्ठांना गुंगारा देत संग्राम थोपटे यांना विरोधी पक्षनेते करण्यासाठी मोर्चेबांधणी केली. विरोधी पक्षनेतेपद हे दुसऱ्या फळीतील आमदारास मिळावे असा दबाव आता तरुणतुर्कांनी आणला आहे. सगळी पदे ज्येष्ठ नेत्यांनाच कशासाठी असा तरुण आमदारांचा सवाल आहे. थोपटे यांच्या समर्थनार्थ जवळपास ३० आमदारांनी सह्यांचे पत्र तयार केले असून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना हे पत्र पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

08:05 AM

आज अधिवेशनाचा दुसरा दिवस; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील सर्व आमदार उपस्थित राहणार?

आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानभवनातील पायऱ्यावर आंदोलन केले. तसेच सभात्यागही केल्याचे दिसून आले. मात्र आज विरोधक नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही गटातील अनेक आमदार अधिवेशनाला उपस्थित नव्हते. त्यामुळे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीतरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटातील सर्व आमदार अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

07:47 AM

उपसभापतिपदावरुन नीलम गोऱ्हे यांना हटवा; विधिमंडळ सचिवांकडे अपात्रता याचिका

विधान परिषदेतील उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांना पदावरून हटवा, या मागणीसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले. चर्चेची मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग केला. त्यानंतर गोऱ्हे यांच्याविरोधात विधिमंडळ सचिवांकडे अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली. तसेच, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन गोऱ्हे यांना पदावरून हटविण्याची मागणी केली.
 

07:41 AM

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्यांचा विक्रम

राज्याच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक रकमेच्या म्हणजे ४१,२४३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या नवे वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केल्या. 

11:29 AM

अधिवेशनाचं कामकाज स्थगित; उद्या सकाळी ११ वाजता होणार सुरु

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यानंतर अधिवेशनाचं कामकाज थांबवण्यात आलं. उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात होईल. 

11:23 AM

बोगस बियाणे प्रकरणावर कडक कारवाई करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बोगस बियाणे प्रकरणावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सरकारला देखील शेतकऱ्यांची चिंता आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

11:23 AM

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी केला सभात्याग

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभात्याग केला आहे. 

10:53 AM

पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरु झालं; एकनाथ शिंदेंनी नवीन मंत्र्यांची करुन दिली ओळख

पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरु झालं आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह नवीन मंत्र्यांची ओळख विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना करुन दिली. 

10:53 AM

आम्ही सरकारला हिसका दाखवू; अंबादास दानवेंचा इशारा

हे फोगस सरकार आहे. सरकारला वाटत असेल की महाविकास आघाडी आम्ही फोडली, मग शांत बसेल. मात्र असं नाही आम्ही यांना चांगला हिसका दाखवू, असा इशारा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिला आहे. अंबादास दानवे विधानभवन परिसरात दाखल झाले, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

10:49 AM

अजित पवारांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधान भवनात आगमन झाले, त्यांनी सर्वप्रथम विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. अनेक कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात, त्यामुळे या भेटीची चर्चा रंगली आहे.

10:42 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील विधानभवनात दाखल झाले आहेत. 

10:35 AM

'घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार असो...'; काँग्रेस आक्रमक, विधानभवनात आंदोलन सुरु

पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशीच काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा काँग्रेसच्या आमदारांनी दिल्या.

10:35 AM

आम्ही सरकारला हिसका दाखवू; अंबादास दानवेंचा इशारा

हे फोगस सरकार आहे. सरकारला वाटत असेल की महाविकास आघाडी आम्ही फोडली, मग शांत बसेल. मात्र असं नाही आम्ही यांना चांगला हिसका दाखवू, असा इशारा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिला आहे. अंबादास दानवे विधानभवन परिसरात दाखल झाले, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

10:33 AM

संख्येप्रमाणे विरोधीपक्षनेता होईल- अंबादास दानवे

संख्येप्रमाणे विरोधीपक्षनेता होईल. आता कोणी दावा केला आहे, याबाबत मला माहिती नाही, असं ठाकरे गटाचे आमदार अंबादाव दानवे यांनी म्हटलं आहे.

10:30 AM

राजकारण म्हणजे फोडाफोडीचं झालंय- वर्षा गायकवाड

राजकारण म्हणजे फोडाफोडीचं झालं आहे. राज्यात विविध प्रश्न आहेत. मात्र सरकार काहीही भूमिका घेत नाहीय. आम्ही अधिवेशनात विविध प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी दिली. 

10:27 AM

देवेंद्र फडणवीसांनीही शिवरायांच्या पुतळ्याला केलं अभिवादन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

10:22 AM

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शिवरायांना केलं अभिवादन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांनी विधानभवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. 

10:22 AM

आम्ही सरकारला हिसका दाखवू; अंबादास दानवेंचा इशारा

हे फोगस सरकार आहे. सरकारला वाटत असेल की महाविकास आघाडी आम्ही फोडली, मग शांत बसेल. मात्र असं नाही आम्ही यांना चांगला हिसका दाखवू, असा इशारा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिला आहे. अंबादास दानवे विधानभवन परिसरात दाखल झाले, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

09:53 AM

विरोधी पक्षनेतेपदासाठी अजूनही कोणचं नाव निश्चित नाही; बाळासाहेब खोरांताची माहिती

विरोधी पक्षनेतेपदासाठी अजूनही कोणचं नाव निश्चित नाही. दिल्लीतून सल्ला घेतोय. आम्ही कोणचही नाव सुचवलेलं नाही, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

09:44 AM

रोहित पवारांनी केलं ट्विट; राज्य सरकारकडे केली महत्वाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, बेरोजगारी, पाऊस नसल्याने खोळंबलेल्या पेरण्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शिल्लक कापूस, शहरी भागातील अडचणी यांसह इतरही अनेक प्रश्न असताना सरकार त्यावर ब्र शब्दही काढत नाही. आता अधिवेशनात तरी या प्रश्नांवर चर्चा होऊन ते सोडवले जावेत, अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

08:27 AM

'विधानसभेतील विरोधी पक्षनेता आमचाच असेल'; बाळासाहेब थोरात यांचा दावा

विधानसभेतील विरोधी पक्षनेता आमचाच राहील, असा ठाम दावा काँग्रेसने केला. काँग्रेसच्या आमदारांची संख्या अधिक असल्याने विधानसभेत आमचाच विरोधी पक्षनेता असेल, असे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 

08:27 AM

किती विधेयके मांडली जाणार?

अधिवेशनात २४ विधेयके व ६ अध्यादेश मांडले जाणार आहेत. महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक राज्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एसआरए प्रकल्पांसंदर्भातील महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक, महानगरपालिका विधेयक, मुंबई महानगरपालिका विधेयक, विद्यापीठासंदर्भातील विधेयके, महाराष्ट्र माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार विधेयक, महाराष्ट्र कॅसिनो विधेयक या महत्त्वाच्या विधेयकांचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे अध्यादेशांमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत व जिल्हा परिषद अध्यादेश, महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक अध्यादेश, महाराष्ट्र सहकारी संस्था अध्यादेश यासारखे महत्त्वाचे अध्यादेश मांडले जाणार आहेत.

Web Title: Maharashtra monsoon assembly session 2023 Pavsali Adhiveshan Live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.