मुंबई : महाराष्ट्रातील वृद्ध सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून स्पष्ट झाले. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात वृद्धांंवरील अत्याचाराचे ६ हजार १६३ गुन्हे नोंद झाले. महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.एनसीआरबीने २०१९ मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जारी केली. यात अन्य राज्यांच्या तुलनेत ज्येष्ठांंवरील अत्याचारात महाराष्ट्र पुढे आहे. संपूर्ण देशात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण २७ हजार ६९६ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी महाराष्ट्रात ६ हजार १६३ गुन्ह्यांची नोंद आहे. त्या खालोखाल मध्य प्रदेश (४,१८४), गुजरात (४,०८८) आणि तामिळनाडू (२,५०९) अशी राज्ये आहेत.महाराष्ट्रात याच प्रकरणी २०१७ मध्ये ५ हजार ३२१ तर २०१८ मध्ये ५ हजार ९६१ गुन्ह्यांची नोंद आहे, तर मुंबई शहरात वृद्धांंवरील अत्याचाराचे एकूण १ हजार २३१ गुन्हे नोंदविण्यात आले.मुलुंडमध्ये ज्येष्ठ नागरिकाची हत्यामुलुंडमध्ये ७० वर्षीय मारुती गवळी यांची विजयनगर परिसरात हत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून,अधिक तपास सुरू आहे.महाराष्ट्रात २०१९ मध्ये घडलेले गुन्हे१५८ वृद्धांंची हत्या१० दरोडे घालण्याच्या घटना समोर आल्या.२ हजार ०५१ गुन्हे हे वृद्धांंना लक्ष्य करून चोरी केल्याप्रकरणी दाखल झाले.३२५ जबरी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली.४३ विनयभंगाचे तर ज्येष्ठ महिलेवरील बलात्काराचे २ गुन्हे घडले.
महाराष्ट्रातील वृद्ध सर्वाधिक असुरक्षित; एनसीआरबीचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 3:20 AM