शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
3
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
4
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
5
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
6
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
7
खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 
8
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
9
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
10
१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट
11
रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 
12
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते
13
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
14
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
15
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
16
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
17
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
18
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
19
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल

Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 7:13 AM

Maharashtra- Mumbai Lok Sabha elections 2024: Seats, schedule Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघासह देशातील ८ राज्ये ...

20 May, 24 08:59 PM

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

आज देशात लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान झाले. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान झाले.

20 May, 24 08:29 PM

ठाणे जिल्ह्यातील १३२०८ मतदान यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत ट्राॅंगरूममध्ये!

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे लाेकसभेच्या २४ उमेदवारांसह, कल्याणच्या २८ आणि आणि भिवंडी २७ उमेदवारांसाठी जिल्ह्याभरात साेमवारी जल्लाेषात मतदान झाले. जिल्ह्याभरातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांपैकी ५० ते ५५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्याभरातील १८ विधानसभा मतदारसंघातील सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवर या मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्रात (ईव्हीएम) त्यांचे बंदिस्त केले आहे. आता या सर्व इव्हीएम मशीन कडक सुरक्षा बंदाेबस्ता ठिकठिकाणच्या ट्राॅंगरूममध्ये जमा करण्यात आल्या. या मतदान यंत्राना ३७ ट्रक, १९ टेम्पाे आणि ३१ कंटेनरव्दारे या ट्राॅंगरूममध्ये जमा करण्यात आले आहेत. या जमा झालेल्या ठिकाणीच ४ जून राेजी या यंत्रांमधील मतमाेजणी करण्यात येईल. ताेपर्यंत या यंत्रणाची सुरक्षा शस्त्रधारी सीआरपीएफ, आरपीएफच्या जवानांकडून तीन टप्यात हाेईल.

20 May, 24 07:56 PM

लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप

अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठीचं महाराष्ट्रातील मतदान आज आटोपलंय. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये पाच टप्प्यांत मतदान झालं. दरम्यान, मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतरही आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील बीड आणि बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप शरद पवार शरद पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

20 May, 24 06:45 PM

भिवंडीत कपिल पाटील चिडले; बोगस मतदान होत असल्याचा केला आरोप

भिवंडी: शहरामध्ये सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानात सायंकाळी काही ठिकाणी वादंग होत गालबोट लागला आहे. खंडूपाडा बाला कंपाउंड मिल्लत नगर येथील अल्पसंख्यांक बहुल असलेल्या मतदान केंद्रावर कपिल पाटील प्रचंड चिडलेले दिसले या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. यावेळी पाटील यांनी निवडणूक अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा यांना धारेवर धरत मतदान केंद्र परिसरात उभे असलेल्या नागरिकांच्या घोळक्याला बाहेर हाकलून लावण्यासाठी मागणी करीत या भागातील मतदान केंद्रावरील गर्दी बाजूला केली. यावेळी अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी कपिल पाटील यांनी केल्या असून काही ठिकाणी बोटावरील शाई पुसण्यासाठी केमिकल घेऊन बसल्याचे दिसून आल्याचा आरोप करीत लोकशाही वाचवायला निघालेले लोकशाहीची हत्या करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

20 May, 24 06:37 PM

राधे माँला व्हीआयपी वागणूक दिल्याने मतदारांमध्ये बाचाबाची

कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ यांनीही प्रथमच बोरीवलीच्या कोरा मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मात्र त्यांच्या आधी रांगेत चार-पाच जण मतदानाकसाठी उभे असताना त्यांना विशेष वागणूक देत मतदान करू देण्यात आले. त्यामुळे रांगेतील मतदारांमध्ये आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.

20 May, 24 06:13 PM

मतदान केंद्रांवरील गैरसोयींचा फटका लोकप्रतिनिधींना

पंखे, पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करणाऱया शेडचा अभाव अशा गैरसोयीच्या वातावरणात सोमवारी मतदारांना मतदानाचा अधिकार बजावावा लागला. काही ठिकाणी याचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसला.

मागाठाणे येथील शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे मतदान केंद्र बोरीवली पश्चिमेला एमएचबी कॉलनी येथील सायली कॉलेजमध्ये होते. परंतु, या केंद्रावर पुरेसे पंखेच नव्हते. त्यामुळे मतदारांसह कर्मचाऱयांनाही प्रचंड उकाड्याला तोंड द्यावे लागत होते. अखेर एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पेडिस्टल पंखे बसविण्यात आले.

20 May, 24 05:55 PM

ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार

मुंबई - ओशिवरा म्हाडा येथील १५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर १० ते १२ जणांच्या नावाने आधीच कुणीतरी मतदान केल्याची तक्रार आहे. त्यामुळे ज्यांच्या नावाने अन्य कुणी मतदान करून गेले त्यांचे बॅलेटवर मतदान घेण्यात आले. हा बोगस मतदानाचा प्रकार असल्याची तक्रार मनसेचे नेते संदेश देसाई यांनी केली आहे.

20 May, 24 05:47 PM

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

20 May, 24 05:46 PM

पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

भिवंडी- 48.89 टक्के
धुळे-  48.81 टक्के
दिंडोरी- 57.06 टक्के
कल्याण - 41.70 टक्के
मुंबई उत्तर - 46.91 टक्के
मुंबई उत्तर मध्य - 47.32 टक्के
मुंबई उत्तर पूर्व - 48.67 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 टक्के
मुंबई दक्षिण - 44.22 टक्के
मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के
नाशिक - 51.16 टक्के
पालघर- 54.32 टक्के
ठाणे - 45.38 टक्के

20 May, 24 05:43 PM

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ४४.२२ टक्के मतदान

मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. ३१ - मुंबई दक्षिण मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ४४.२२ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी (अंदाजे) पुढीलप्रमाणे.. 

१८४-भायखळा - ४१.३० टक्के 
१८७-कुलाबा -३४.२९ टक्के  
१८५-मलबार हिल - ४८.८० टक्के 
१८६-मुंबादेवी - ४६.७७ टक्के 
१८३- शिवडी - ४८.३३ टक्के 
१८२-वरळी - ४५.८१ टक्के       
 

20 May, 24 05:41 PM

३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ४८.२६ टक्के मतदान

मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३०- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. ३०- मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ४८.२६ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३०- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय सरासरी टक्केवारी (अंदाजे) पुढीलप्रमाणे, 

१७२-अणुशक्ती नगर - ४७.७५ टक्के  
१७३-चेंबूर - ५०.३३ टक्के 
१७८-धारावी - ४५.१२ टक्के  
१८१-माहीम - ५१.१२ टक्के 
१७९-शीव कोळीवाडा - ४५.२० टक्के 
१८०- वडाळा - ५१.२५ टक्के     

20 May, 24 05:37 PM

भिवंडीत सेवानिवृत्त वृद्ध शिक्षक मतदानापासून वंचित

भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या भिवंडी पूर्व पश्चिम ग्रामीण शहापूर मुरबाड व कल्याण पश्चिम या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांमध्ये मतदानाच्या दिवशी घोळ दिसला.भिवंडीतील ग्रामीण मतदार संघात येत असलेल्या वडघर येथे ८३ वर्षाचे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षकांचे नाव मतदार यादीतून गहाळ करण्यात आले आहे. मतदार यादीतून नाव गहाळ झाल्यामुळे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षकांना लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. 

20 May, 24 04:58 PM

पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपल्याला आपल्या वडिलांची उणीव प्रकर्षाने जाणवली. पण घटकपक्षांतील सहकाऱ्यांनी साथ दिल्यामुळे सर्वकाही शक्य झाले, अशी भावना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आज सकाळी  मतदानाला निघताना पत्रकारांकडे व्यक्त केली. याठिकाणी त्यांचा थेट सामना शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याशी आहे.

20 May, 24 04:41 PM

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ३६.६४ टक्के मतदान

मुंबई :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. ३१ - मुंबई दक्षिण मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ३६.६४ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी (अंदाजे) पुढीलप्रमाणे.. 

१८४-भायखळा - ३७.२७ टक्के 
१८७-कुलाबा -३०.६२ टक्के  
१८५-मलबार हिल - ४०.०१ टक्के 
१८६-मुंबादेवी - ३७.०१ टक्के 
१८३- शिवडी - ३८.८० टक्के 
१८२-वरळी - ३६.१२ टक्के       

20 May, 24 04:31 PM

दुपारी १ नंतर मतदानाचा बहर कमी

नाशिक : सकाळी ८ पासून लागलेल्या मतदानाच्या रांगांमध्ये दुपारी १ च्या सुमारास काहीशी घट आल्याचे दिसून येत होते. उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदारांनी दुपारी १ च्या आसपास मतदार येण्याचे प्रमाण कमी होऊ लागले होते. त्यामुळे सकाळपासून दुपारी १ पर्यंत सरासरी २६ टक्के झालेल्या मतदानात केवळ ११ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.

20 May, 24 04:25 PM

कल्याण ग्रामीणमध्ये मतदारांची नावं गायब

कल्याण -  मतदान यादीतून नावे डिलीट झाल्याने हजारो नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तर काही भागात मतदान करण्यासाठी लागणारी कागदपत्रे मतदारांकडे असून देखील त्यांना मतदान करता आले नाही. 

20 May, 24 04:16 PM

ठाणे जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत ३५.०२ टक्के मतदान

१) ठाणे लोकसभा मतदारसंघात - ३६.०७ टक्के

२) भिवंडी लोकसभा मतदारसंघात - ३७.०६ टक्के

३) कल्याण लोकसभा मतदारसंघात - ३२.४३ टक्के

20 May, 24 03:50 PM

निवडणूक आयोगाचे ढिसाळ नियोजन -डॉ.दीपक सावंत

मुंबई - मतदारांमधे उत्साह असूनही मतदान अधिकारी मतदान करवून  घेण्यात उत्साही नव्हते. ते मतदानाचा टक्का वाढवण्यात कमी पडत होते, मतदार किमान एक ते सव्वा तास रांगा लावूनही नंबर लागत नव्हता. याचा अनुभव स्वत: राज्याचे माजी आरोग्य मंत्री व कुपोषण निर्मूलन टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष( मंत्री दर्जा ) डॉ.दीपक सावंत यांना आला. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व आस्थापनातून निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्व ट्रेनिंग देऊन काय मिळवले असा आता प्रश्न आता मतदारांनी विचारायला सुरुवात केल्याची माहिती त्यांनी दिली.

20 May, 24 03:57 PM

शंकर महादेवन यांनी वाशी येथे केले मतदान

संगीतकार व गायक शंकर महादेवन यांनी वाशी येथे सहपरिवारासह केले मतदान आणि मतदान करण्याचे नागरिकांनाही केले आव्हान 

20 May, 24 04:07 PM

अलिबाग : राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील १३ मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया २० मे रोजी पार पडली जात आहे. रायगड लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी मुंबई अंधेरी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अंधेरी पश्चिम येथील एम एस हायस्कूल येथील मतदान केंद्रावर गीते यांनी मतदान केले. इंडिया आघाडीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास अनंत गीते यांनी बोलून दाखवला आहे. 
 

20 May, 24 03:57 PM

सेंट ज्युड हायस्कूल, जनकल्याण नगर, मालाड-पश्चिम येथील मतदार केंद्रावर रांगेत उभं राहून आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांनी मतदानाचा हक्क बजावला.

20 May, 24 03:55 PM

कल्याण लोकसभेत दुपारी 3 वाजेपर्यंत झालेलं एकूण मतदान- 32.43%

अंबरनाथ- 27.02%
डोंबिवली- 36.55%
कल्याण पूर्व- 32.44%
कल्याण ग्रामीण- 35.13%
मुंब्रा-कळवा- 31.82%
उल्हासनगर- 31.73%

20 May, 24 03:53 PM

३ वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के मतदान

लोकसभेसाठी नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघांमध्ये सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अजूनही तीन तासांमध्ये ही आकडेवारी वाढण्याची शक्यता असून मागील लोकसभेपेक्षा यंदा जास्त मतदान होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

20 May, 24 03:50 PM

सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत झालेले मतदान

भिवंडी लोकसभा - ३७.६%
ठाणे लोकसभा - ३६.७%
कल्याण लोकसभा - ३२.४३%

20 May, 24 03:41 PM

मुंब्रा येथे एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

20 May, 24 03:40 PM

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी २४.४६ टक्के मतदान

मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. ३१ - मुंबई दक्षिण मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात दुपारी ०१.०० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी २४.४६ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी (अंदाजे) पुढीलप्रमाणे...

१८४-भायखळा - २१.०० टक्के 
१८७-कुलाबा -२०.३९  टक्के  
१८५-मलबार हिल - ३२.७८ टक्के 
१८६-मुंबादेवी - २६.३० टक्के 
१८३- शिवडी - २७.७८ टक्के 
१८२-वरळी - १८.५१ टक्के   

20 May, 24 03:39 PM

हृतिक रोशनने कुटुंबीयांसह केलं मतदान

20 May, 24 03:35 PM

रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी बजावला मतदानाचा हक्क

20 May, 24 03:32 PM

अलिबाग : राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील १३ मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया २० मे रोजी पार पडली जात आहे. रायगड लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी मुंबई अंधेरी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अंधेरी पश्चिम येथील एम एस हायस्कूल येथील मतदान केंद्रावर गीते यांनी मतदान केले. इंडिया आघाडीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास अनंत गीते यांनी बोलून दाखवला आहे. 
 

20 May, 24 03:29 PM

सायन प्रतीक्षा नगर बूथ क्रमांक १८ मध्ये लोकांना चार तास लागत आहेत. अनेक मतदार मतदान न करताच घरी परतत आहेत.

20 May, 24 03:26 PM

निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.

20 May, 24 03:19 PM

आमिर खान आणि किरण रावने केलं मतदान

20 May, 24 03:10 PM

बजरंगवाडीच्या हरित मतदान केंद्राने वेधले लक्ष

नाशिक - मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने एका केंद्रात हरित मतदान केंद्र स्थापन करण्यात आल्याने ते आकर्षण ठरले. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिकरोडच्या हॅपी होम कॉलनी ,बजरंग वाडी येथे केवळ १७ टक्के मतदान झालेले होते. त्यामुळे त्याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासन आणि नाशिक महानगरपालिका यांनी या भागातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विशेष प्रयत्न केले. 

20 May, 24 03:02 PM

प्रिया बापट, उमेश कामत यांनी केलं मतदान

20 May, 24 03:01 PM

नाशिक जिल्ह्यात सुमारे ३१ टक्के मतदान

लोकसभेसाठी नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघांमध्ये सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. दुपारी १वाजेपर्यंत ३०.६६ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. शेवटच्या तासामध्ये मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.  

20 May, 24 02:59 PM

ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगीरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

नाशिक- नाशिक शहरात शांंततेत मतदान सुरू असली काही ठिकाणी किरकोळ वाद तसेच मतदानाच्या दिवशी प्रचार सुरू असल्याचे आढळले. जयबाबाजी भक्त परीवाराचे प्रमुख शांतिगीरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे मतदान केले मात्र त्यानंतर त्यांनी ईव्हीएमला हार घातल्याचे दिसल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

20 May, 24 02:58 PM

पालघर:- दुपारी 1 वाजेपर्यंत 31.06 टक्के मतदान झाले

20 May, 24 02:17 PM

सखी आणि शुभांगी गोखले यांनी केलं मतदान

20 May, 24 02:08 PM

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान

मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा. पासून सूरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे-  २८.७३ टक्के
दिंडोरी-  ३३.२५ टक्के
नाशिक -  २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६  टक्के
भिवंडी-   २७.३४ टक्के
कल्याण  -    २२.५२ टक्के
ठाणे -  २६.०५  टक्के
मुंबई उत्तर - २६.७८  टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - २८.४१  टक्के
मुंबई उत्तर - पूर्व -  २८.८२  टक्के
मुंबई उत्तर - मध्य - २८.०५  टक्के
मुंबई दक्षिण - मध्य-  २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण - २४.४६  टक्के

20 May, 24 02:07 PM

१ वाजेपर्यंत झालेले मतदान

भिवंडी लोकसभा - २७.३४%
ठाणे लोकसभा - २६.५%
कल्याण लोकसभा - २२.५२%

20 May, 24 02:04 PM

आमदार गणेश नाईक यांनी सहपरिवार केले मतदान

20 May, 24 02:02 PM

नवी मुंबईत मतदानासाठी रांगा, एक वाजेपर्यंत 25.39% मतदान

 नवी मुंबई: ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबईत मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत २५.३९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर विधानसभा क्षेत्रातही सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सकाळी सातपासूनच सर्व केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दुपारी एक वाजेपर्यंत ऐरोलीत २५.०७ व बेलापूर मध्ये २५.७२ टक्के मतदानाची नोंद झाली होती.  

20 May, 24 02:01 PM

मुंबईकर मोदींसाठी मतदान करणार - विनोद तावडे

मुंबई - मुंबईत मतदार आपलं कर्तव्य बजावतायेत. सुरक्षित आणि विकसित भारतासाठी लोक मतदानाला बाहेर पडलेत. लोकांची इतकी गर्दी आहे त्यामुळे हे चित्र पाहून आनंद वाटतो. पाचव्या टप्प्याचं जे काही विश्लेषण आम्ही केलंय त्यात ४०० पारचा जो आकडा आम्ही काढलाय तो नक्की पूर्ण करू. मुंबईकर मोदींसाठी मतदान करणार. १० पैकी ८ जण तेच बोलतायेत.विधानसभेला वेगळे चित्र लोकांच्या मनात असूही शकतं, मला माहिती नाही. पण आजतरी मोदींसाठी मतदान आहे. पंतप्रधानपदाचा दावा केला नाही तर इंडिया आघाडीला बूथवर कार्यकर्तेही मिळणार नाहीत. त्यामुळे दावा करणं स्वाभाविक आहे - विनोद तावडे, भाजपा नेते 

20 May, 24 01:59 PM

ठाणे लोकसभा मतदारसंघात दुपारी 1.00 वाजेपर्यंत अंदाजे 26.05 टक्के मतदान

ठाणे :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आज  20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली. 25 ठाणे मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1.00 वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 26.05 टक्के मतदान झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे---

145 मिरा भाईंदर – 28.39  टक्के
146 ओवळा माजिवडा – 20.18 टक्के
147 कोपरी पाचपाखडी – 29.88 टक्के
148 ठाणे – 29.53 टक्के
150 ऐरोली – 25.07 टक्के
151 बेलापूर – 25.72 टक्के

20 May, 24 01:52 PM

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी २४.४६ टक्के मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात आज २० मे २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. ३१ - मुंबई दक्षिण मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात दुपारी ०१.०० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी २४.४६ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी (अंदाजे) पुढीलप्रमाणे... 

१८४-भायखळा - २१.०० टक्के 
१८७-कुलाबा -२०.३९  टक्के  
१८५-मलबार हिल - ३२.७८ टक्के 
१८६-मुंबादेवी - २६.३० टक्के 
१८३- शिवडी - २७.७८ टक्के 
१८२-वरळी - १८.५१ टक्के       

20 May, 24 01:49 PM

३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी २७.२१ टक्के मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३०- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आज २० मे २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. ३०- मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात दुपारी ०१.०० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी २७.२१ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३०- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय सरासरी टक्केवारी (अंदाजे) पुढीलप्रमाणे----

१७२-अणुशक्ती नगर - २६.१० टक्के  
१७३-चेंबूर - २९.२१ टक्के 
१७८-धारावी - २५.२९ टक्के  
१८१-माहीम - ३२.३१ टक्के 
१७९-शीव कोळीवाडा - २१.३६ टक्के 
१८०- वडाळा - ३०.८९ टक्के 

20 May, 24 01:48 PM

धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे-
6 धुळे ग्रामीण – 31.39 टक्के
7 धुळे शहर – 27.12टक्के
8 शिंदखेडा -27.16 टक्के
114 मालेगांव मध्य – 33.28 टक्के
115 मालेगांव बाहृय – 26.00 टक्के
116  बागलाण – 27.45 टक्के

20 May, 24 01:47 PM

धुळे लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.73 टक्के मतदान

धुळे - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून सुरुवात झाली. 02-धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 28.73 टक्के मतदान झाले आहे.
 

20 May, 24 01:42 PM

नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान

व्होट कर नाशिककर या प्रशासन आणि अन्य सेवाभावी संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अभिनेत्री सायली संजीव, अक्षय मुडावदकर यांच्यासह अन्य अनेकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पडले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नाशिकमधील शासकीय यंत्रणा तसेच खासगी सेवाभावी संस्थांनी देखील व्होटकर नाशिककर अशी मोहिम राबवली. 

20 May, 24 01:41 PM

शांतिगिरी महाराजांच्या भक्तांना घेतले ताब्यात

सिडको भागात मतदान सुरू असताना  रायगड चौक भागात नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या काही भक्तांनी त्यांच्या बादलीची निशाणी असलेल्या मतदान स्लीप ह्या मतदारांना वाटप करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन संबंधित भक्तांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल केला.

20 May, 24 01:40 PM

नाशिक मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 28.22 टक्के मतदान

20 May, 24 01:40 PM

ठाण्यात तृतीय पंथीयांनीही बजावला मतदानाचा हक्क.

20 May, 24 01:39 PM

सिंगापूरवरून दांपत्य मतदानासाठी नवी मुंबईत

नवी मुंबई: ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबईत  सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्या आहेत.  सिंगापूर वरून खास मतदानासाठी आलेले दीक्षित दांपत्यानेही वाशीमध्ये मतदानाचे कर्तव्य पार पाडले. सलील शशिकांत दिक्षित व सुप्रीया दिक्षित ८ वर्षापासून सिंगापूरला राहतात.

20 May, 24 01:35 PM

एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघात सकाळ पासून सुरळीत मतदान सुरू होते. मात्र अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात आल्याचे दिसून आले. त्यात अनेक जेष्ठ नागरिकांची पुरते हाल झाल्याचे दिसून आले. ठाण्यातील अनेक मतदान केंद्रावर सकाळ पासून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. मात्र घोडबंदर असेल येऊर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, शास्त्री नगर आदी सह शहरातील भागात अनेक नागरिकांच्या एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर आल्याचे दिसून आले. 

20 May, 24 01:22 PM

बोरिवलीच्या कोरा केंद्र मतदार केंद्रावर राधे माँने बजावला मतदानाचा हक्क

20 May, 24 01:21 PM

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

20 May, 24 01:19 PM

नाशिकमध्ये मतदान केल्याबद्दल मिळाले रोपट्याची भेट

नाशिक- लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नाशिकमधील विविध संस्थांनी ‘वाेट कर नाशिककर’ अशी मेाहिम राबवली, त्यानंतर मतदान करणाऱ्यांना मतदारांना अनेक व्यवसायिकांनी सवलती देखील
जाहिर केल्या आहेत. आज मतदान करणाऱ्यांना नाशिक मधील अर्थ फाऊंडेशनच्या वतीने मतदान करणाऱ्यांना रोपटे देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. आता

दुपारपर्यंत पाचशेहून अधिक रोपे मतदारांना देण्यात आली.
 

20 May, 24 01:15 PM

एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघात सकाळ पासून सुरळीत मतदान सुरू होते. मात्र अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात आल्याचे दिसून आले. त्यात अनेक जेष्ठ नागरिकांची पुरते हाल झाल्याचे दिसून आले. ठाण्यातील अनेक मतदान केंद्रावर सकाळ पासून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. मात्र घोडबंदर असेल येऊर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, शास्त्री नगर आदी सह शहरातील भागात अनेक नागरिकांच्या एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर आल्याचे दिसून आले. 

20 May, 24 01:11 PM

कल्याण ग्रामीण भागातील भाल येथील जिल्हा परिषद शाळेत मंडपाची व्यवस्था नसल्याने मतदार नाराज झाले होते. त्यातच मतदार ज्या ठिकाणी उभे होते त्याठिकाणी पंखा नसल्याने घामाच्या धारेत मतदार रांगेत उभे.

20 May, 24 01:10 PM

पवई केंद्रातही एका बुथवरील मशीन बंद ,आदेश बांदेकर ,केदार शिंदे गेले दीड तास रांगेत उभे

20 May, 24 12:54 PM

सिडकोत मतदारांच्या रांगा

नाशिक लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी सुरुवात झाली सकाळपासूनच गणेश चौक तसेच मारवाडी हायस्कूल होते मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदार हे स्वयंस्फूर्तीने मतदान करताना दिसून आले पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. 

20 May, 24 12:39 PM

मुलुंड बूथ क्रमांक १२६: मतदानप्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे निवडणूक यंत्रणेचे स्पष्टीकरण. सुरुवातीला व्हीव्हीपॅट यंत्रात काहीसा बिघाड होता. तो तत्काळ दुरुस्त केल्यानंतर आता मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू.

20 May, 24 12:38 PM

नाशिकमध्ये १६.३ तर दिंडोरीत १९.५ टक्के मतदान

नाशिक- शहरासह जिल्ह्यात मतदारांच्या प्रचंड उत्साहात मतदान सुरू झाले असून सकाळी अकरा वाजेपर्यंत नाशिक लोकसभा मतदार संघात १६.३ टक्के तर दिंडोरी लाेकसभा मतदार संघात १९.५ टक्के इतके मतदान झाले आहे. लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडाेरी मतदार संघात सकाळी १९.५ टक्के मतदान झाले. नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगीरी महाराज आणि वंचीत बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्यासह ३१ उमेदवार रिंगणात आहे. तर दिंडोरीला महायुतीच्या वतीने केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यासह १० जण उमेदवार मैदानात आहेत.

20 May, 24 12:30 PM

कलाकारांनी केलं मतदान

स्पृहा जोशी, पृथ्वीक प्रताप, गौरव मोरे, पूजा भट्ट, महेश भट्ट, प्रशांत दामले, सुनील बर्वे, रवी जाधव, मेघना जाधव, स्वप्नील जोशी यांनी केलं मतदान

20 May, 24 12:23 PM

जुन्या नाशकात मतदान केंद्रांवर गोंधळ

20 May, 24 12:17 PM

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीते यांच्यामध्ये शिवीगाळ

जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर माजी आमदार वसंत गीते भाजपच्या सत्ताधारी आमदार देवयानी फरांदे हे समोरासमोर भिडले शिवीगाळ परिस्थिती तणावग्रस्त बंदी दोन्ही गटाचे कार्यकर्ते जुने नाशिक परिसरात समोरासमोर आले वाजे गट उद्धव सेना व शिंदे सेना आणि भाजपाचे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

20 May, 24 12:16 PM

नाशिकमध्ये १६.३ तर दिंडोरीत १९.५ टक्के मतदान

नाशिक- शहरासह जिल्ह्यात मतदारांच्या प्रचंड उत्साहात मतदान सुरू झाले असून सकाळी अकरा वाजेपर्यंत नाशिक लोकसभा मतदार संघात १६.३ टक्के तर दिंडोरी लाेकसभा मतदार संघात १९.५ टक्के इतके मतदान झाले आहे. लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडाेरी मतदार संघात सकाळी १९.५ टक्के मतदान झाले. नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगीरी महाराज आणि वंचीत बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्यासह ३१ उमेदवार रिंगणात आहे. तर दिंडोरीला महायुतीच्या वतीने केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यासह १० जण उमेदवार मैदानात आहेत.

20 May, 24 12:07 PM

मतदान केंद्राच्या बाहेर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी उभे असलेले मतदार. मतदार यादीत नाव सापडत नसल्याकारणाने मॉडेल हायस्कूलच्या मतदान केंद्राबाहेर लागलेली मतदारांची रांग

20 May, 24 12:06 PM

नाशिकरोड देवळाली गाव मालधक्का रोड तक्षशिला विद्यालयात अपंग पती विश्वनाथ रामनरेश कठारिया पत्नी रोशनी विश्वनाथ कठारिया मतदान केंद्राच्या पायरीपर्यंत तीन चाकी दुचाकी वर मतदानासाठी रांगेत उभे असताना

20 May, 24 11:52 AM

राज्यात 11 वाजेपर्यंत 15.93 टक्के मतदान

20 May, 24 11:45 AM

भिवंडी लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत अंदाजे 14.79 टक्के मतदान

ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

134 भिवंडी ग्रामीण – 18.55 टक्के
135 शहापूर – 13.44 टक्के
136 भिवंडी पश्चिम – 11.72 टक्के
137 भिवंडी पूर्व – 17.52 टक्के
138 कल्याण पश्चिम – 12.63 टक्के
139 मुरबाड – 14.89 टक्के 

20 May, 24 11:44 AM

मुंबई उत्तर पश्चिममध्ये सकाळी अकरापर्यंत 17.53 टक्के मतदान झालं आहे. 

20 May, 24 11:43 AM

कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत अंदाजे 11.46 टक्के मतदान

ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

140 अंबरनाथ – 11.24 टक्के
141 उल्हासनगर – 11.09 टक्के
142 कल्याण पूर्व – 15.11 टक्के
143 डोंबिवली – 7.00 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 10.60 टक्के
149 मुंब्रा कळवा  – 13.03 टक्के

ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.
 

20 May, 24 11:43 AM

ठाणे लोकसभा मतदारसंघात सकाळी 11.00 वाजेपर्यंत अंदाजे 14.86 टक्के मतदान

ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे

145 मिरा भाईंदर – 16.64 टक्के
146 ओवळा माजिवडा – 11.70 टक्के
147 कोपरी पाचपाखडी – 16.87 टक्के
148 ठाणे – 15.39 टक्के
150 ऐरोली – 15.68 टक्के
151 बेलापूर – 13.76 टक्के

ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

20 May, 24 11:34 AM

राजन विचारे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार

20 May, 24 11:34 AM

दिंडोरी मतदार संघामध्ये मतदानाची आकडेवारी पोहोचली 19.5 टक्क्यांवर

20 May, 24 11:34 AM

ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी

145 मिरा भाईंदर – 6.14 टक्के
146 ओवळा माजिवडा – 5.85 टक्के
147 कोपरी पाचपाखडी – 5.20 टक्के
148 ठाणे – 3.62 टक्के
150 ऐरोली – 6.48 टक्के
151 बेलापूर – 6.18 टक्के

ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

20 May, 24 11:30 AM

कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज सकाळी  लोकसभा निवडणुकीचे मतदान दूधसागर सोसायटी, सीबा रोड, गोरेगाव पूर्व येथील मतदान केंद्रावर  केले.

20 May, 24 11:29 AM

छगन भुजबळ कुटुंबातील सदस्यांसोबत मतदान करून आले.

20 May, 24 11:20 AM

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्यामुळे सुनील राऊत पोलिसांवर संतापले आहेत. त्यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोडण्याचा आग्रह धरला आहे.

20 May, 24 11:14 AM

शिवसेनेचे स्टार प्रचारक गोविंदा यांनी जुहू येथे केले मतदान

चित्रपट अभिनेते आणि शिवसेनेचा स्टार प्रचारक गोविंदा यांनी जुहू येथे मतदान केले आहे. मतदानानंतर गोविंदा म्हणाले की, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे.

20 May, 24 11:09 AM

मतदारांना मार्गदर्शन करू नये असा नियम नाही: संजय राऊत

कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत आक्रमक झाले. मतदारांना मार्गदर्शन करू नये, असा नियम नाही. निवडणूक आयोग सध्या भाजपाची शाखा म्हणून काम करतेय. भाजपाचे लोक पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांवर अटक करायला लावतात, अशी टीका संजय राऊतांनी केली.

20 May, 24 11:07 AM

कल्याण लोकसभेत चांगल्या प्रकारचे मतदान: श्रीकांत शिंदे

काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद झालेली आहे. मात्र आता ती सुरळीत सुरू आहे. माझं मतदारांना आव्हान आहे की, मोठ्या संख्येने घराच्या बाहेर निघून मतदान करा. कल्याण लोकसभेत चांगल्या प्रकारचे मतदान सकाळी सहा वाजेपासून लोक रांगेत उभे आहेत. नवीन मतदारांनाही आमचं आव्हान आहे की, घराच्या बाहेर निघून मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा. चांगल्या पद्धतीने मतदान सुरू आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

20 May, 24 11:05 AM

या वेळेस मतदानाची टक्केवारी वाढली आहे: राजू पाटील

कोविड काळानंतर मतदानाची संधीच मिळाली नव्हती जसा मी मतदान केलं तसं अनेक मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह आहे. या वेळेस मतदानाची टक्केवारी वाढली आहे.निवडणुकीची कार्यकर्त्यांना भूक असते चार साडेचार वर्ष कोणत्याच निवडणुका नसल्यामुळे त्यांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात उत्सुकता दिसते आहे, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे.
 

20 May, 24 11:01 AM

दक्षिण मुंबई सुस्त; वरळीत जेमतेम २.८६ टक्के

दक्षिण मुंबईमध्ये सर्वात कमी 5.34 मतदानाची नोंद झाली आहे. इतिहासात दक्षिण मुंबईसारख्या उच्चभ्रू भागात मतदानाचा आकडा कायमच कमी राहिला आहे. त्यातही वरळीत अवघ्या 2.86 टक्के मतदानाची नोंद आहे. तर मलबार हिलमध्ये 8.15 टक्के मतदान झाले आहे.

20 May, 24 10:57 AM

नाशिक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांच्या समर्थकांनी सर्वच मतदान केंद्रांवर एकाच गणवेशात लावली हजेरी.

20 May, 24 10:56 AM

धुळे लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.92 टक्के मतदान

धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे:

7 धुळे शहर – 5.84 टक्के
6 धुळे ग्रामीण – 7.86 टक्के
8 शिंदखेडा -5.87 टक्के
114 मालेगांव मध्य – 9.00 टक्के
115 मालेगांव बाहृय – 5.00 टक्के
116  बागलाण – 8.38 टक्के

20 May, 24 10:55 AM

मातोरी गावातील मतदार याद्यांच्या घोळ अनेक मतदारांचे नावे दरी गावात वर्ग झाल्याने मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे , तर राजाभाऊ वाजे , शांतीगीरी महाराज ,आणि हेमंत गोडसे  यांचे बूथ लागले असून कोणताही अनुचित प्रकार झाला नसून शांततेत मतदान सुरू.

20 May, 24 10:51 AM

मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यासाठी बंदी घातली असल्याने मतदार व बाहेरून बंदोबस्त कामासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांत शाब्दिक वादावादी

20 May, 24 10:51 AM

पंचवटी गोदावरी विद्यालयात मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी

20 May, 24 10:51 AM

मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंचे आवाहन

राज ठाकरे यांनी सहकुटुंब केले मतदान. मतदानाचा अधिकार बजावा, राज ठाकरेंनी केले आवाहन.

20 May, 24 10:49 AM

ठाण्यात कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क

20 May, 24 10:49 AM

धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे हे मतदान करण्यासाठी रवाना 

20 May, 24 10:46 AM

आमदार राजू पाटील यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क 
 

20 May, 24 10:37 AM

पहिल्या दोन तासात नाशिक जिल्ह्यात 6.74% मतदान 

20 May, 24 10:25 AM

अभिनेते प्रशांत दामले यांनी बजावला मतदानाचा हक्क

20 May, 24 10:24 AM

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांनी दळवट येथे मतदानाचा हक्क बजावला.

20 May, 24 10:20 AM

धुळे लोकसभा मतदान संघातील मालेगाव मध्य व बाह्य मतदार संघाची निवडणूक प्रकिया पार पडत आहे. मालेगाव कॅम्प भागातील शुभदा विद्यालयात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आपल्या कुटूंबासह सकाळी मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी मंत्री भुसे यांचे पूत्र अजिंक्य भुसे उपस्थित होते. दरम्यान वाढत्या उन्हाला सामारे जावे लागू नये, यासाठी शहरातील मध्य व बाह्य भागातील मतदारांनी गर्दी दिसून आली.

20 May, 24 10:19 AM

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी कल्याण पश्चिमेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

20 May, 24 10:17 AM

राज्याचे मुख्यमंत्री एक़नाथ शिंदे यांनी किसननगर येथील 255 मतदान केंद्रावर कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क. यावेळी वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा व कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mumbaiमुंबईkalyan-pcकल्याणthane-pcठाणेbhiwandi-pcभिवंडीpalghar-pcपालघरnashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरीdhule-pcधुळेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी