कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यात हाहाकार माजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. तरीही सातत्यानं नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या वर असल्याचंच दिसून येत आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत ६७ हजार ४६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर तब्बल ५६८ जणांचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. राज्यात कडक निर्बंध लावले असले तरी कोरोनाबाधितांची संख्या कमी अद्यापही कमी झालेली नाही. गेल्या चोवीस तासांमध्ये ६७ हजार ४६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे ५४ हजार ९८५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यात ४० लाख २७ हजार ८२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात ६ लाख ९५ हजार ७४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ८१.१५ टक्क्यांवर आला आहे.