विधानसभा निवडणुका संपल्या. पुन्हा एकदा महायुती सत्तेवर आली आहे. नव्या मंत्रिमंडळाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्राच्या DGP पदी नियुक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने त्यांच्याविरोधात तक्रारी दिल्या होत्या. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार डीजीपी रश्मी शुक्ला यांना हटवले होते. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा यांनी डीजीपी म्हणून पदभार स्वीकारला होता.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मागणीनंतर रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्यात आले होते. निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत संजय वर्मा यांनी डीजीपी पद स्विकारले होते. निवडणूक काळात रश्मी शुक्ला यांना याच कालावधीसाठी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.
विधानसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी निवडणूक आयोगाकडे केली होती.
नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर या आधीच विरोधकांनी फोन टॅपींचा आरोप केला आहे. हे प्रकरण दोन वर्षापूर्वी गाजले होते. यामुळेच शुक्ला चर्चेत आल्या होत्या.