मुंबई: राज्याचे पोलीस दल आता अधिक बळकट होणार आहे. येत्या काही दिवसांत राज्यात 50 हजार पदांची भरती (Maharashtra Police recruitment) करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे (Dilip Walse Patil) पाटील यांनी मंगळवारी हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) अखेरच्या दिवशी केली. राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आरआर पाटील यांच्या काळातल्या घोषणेपैकी उर्वरीत पदे भरली जाणार आहेत.
आरआर पाटलांच्या काळातील भरतीविधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मान्य केले. आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी 60 हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी 10 हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित 50 हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
महिलांवरील अत्याचारात वाढराज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलीये. महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केली होती. त्याला गृहमंत्री पाटील यांनी उत्तर देताना महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची कबुली दिली. तसेच, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा केला आहे. त्यातील फाशीच्या शिक्षेबाबत वेगवेगळी मते आहेत. परंतु, सरसकट फाशीच्या शिक्षेची तरतूद नसून, अत्यंत घृणास्पद कृत्यासाठी ही तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नव्याने भरती प्रक्रिया राबवणारवळसे पाटील पुढे म्हणाले की, सध्या राज्यात पहिल्या टप्प्यातील 5200 पदांची भरती सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील 7 हजार पोलीस भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. राज्यातील पोलिसांची संख्या कमी आहे. आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.