शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

Maharashtra Political Crisis: "बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, ती माणसं मोठी झाली आणि विरोधात गेली"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 9:25 PM

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. 

मुंबई - शिवसेनेचे दिग्गज नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 50 बंडकोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचे समर्थन काढल्याचे जाहीर केले, त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. दरम्यान, आताच सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारला धक्का देणारा निर्णय दिला. उद्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरांवर टीकाही केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी गेल्यावेळेस म्हणालो होतो, काळजी करण्याची गरज नाही. ज्या गोष्टी चालू होत्या, त्या चालूस राहतील. तुमच्या आशिर्वादाने इथपर्यंची वाटचाल चांगली झाली. सरकार म्हणून आपण काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडला निधीन देऊन सुरुवात केली. हा एक योगायोग होता. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. आतासुद्धा पीक विमा योजनेचे बीड पॅटर्न करुन घेतले.'' 

''या सगळ्या गोंधळात, काही गोष्टी बाजूला पडतात. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. आज मला विशेष समाधान आहे, आयुष्य सार्थकी लागलं. स्वतः शिवसेनाप्रमुखांनी ज्या शहराला संभाजीनगर नाव दिलं, त्याचे नामांतर माझ्या हाताने झाले. उस्मनाबादचेही धाराशिव केले. जिथे लहानाचा मोठा झालो, आता मुख्यमंत्री झालो, त्या वांद्रे वसाहतीत लोकांना भूखंड मंजूर केला.''

'सर्व सहकार्यांचे आभार'

ते पुढे म्हणाले की, '' असे म्हणतात ना एखादी गोष्ट चांगली चालू असते, तेव्हा दृष्ट लागते. कोणाची लागली, ते तुम्हाला माहिती आहे. आज मला सोनिया , शरद पवार आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानायचे आहे. दुःख या गोष्टीचे वाटले की, या ठरावाच्या वेळेस आम्ही फक्त चार मंत्री होतो, बाकीचे मंत्री तुम्ही जानता कुठे आहेत. इतर पक्षांनी एका शब्दानेही या नामांतराला विरोध केला नाही, त्यांना धन्यवाद. ज्यांचा विरोध होता असं भासवलसं जात होतं, ते सोबत राहिले आणि जे सोबत होते, ते विरोधात गेले. 

'बाळासाहेबांनी खूप काही दिलं'

''बाळासाहेबांनी अनेक लहानांना मोठं केलं. नगरसेवक, आमदार खासदार आणि मंत्रीही केलं. ही माणसे मोठी झाली, मोठी झाल्यानंतर आम्हालाच विसरले. ज्यांना मोठं केलं, सत्ता आल्यानंतर शक्य ते सगळं दिलं, ती लोक आज नाराज आहेत. मी मातोश्रीवर आल्यानंतर साधी माणसं येथे येतायत, ते म्हणतात आम्ही सोबत आहोत. ज्यांना दिलं, ते नाराज, ज्यांना काही दिलं नाही, ते सोबत आहेत. याला म्हणतात शिवसेना. या नात्याच्या जोरावर सेना उभी आहे. अनेक आव्हान या लोकांच्या सोबतीने परतवत आली आहे.'' 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय