पुण्याचे नाव जिजाऊनगर करा; मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेआधीच काँग्रेसने मागणी केली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 06:10 PM2022-06-29T18:10:57+5:302022-06-29T18:11:37+5:30
Maharashtra Political Crisis: आजची ही बैठक नामांतर बैठक ठरणार आहे. कालच्या बैठकीत मंत्री अनिल परब यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर कारावे, उद्याच्या बैठकीत यावर ठराव संमत करावा अशी मागणी केली होती.
कालच्या बैठकीत मंत्री अनिल परब यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर कारावे, उद्याच्या बैठकीत यावर ठराव संमत करावा अशी मागणी केली होती. यानुसार आजची मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सुरुवात होते न होते तोच दोन मंत्री बाहेर पडले. परंतू नंतर वर्षा गायकवाड या पुन्हा माघारी आल्या आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतून वर्षा गायकवाड, अस्लम शेख बाहेर पडले; कारण अस्पष्ट
असे असताना शिवसेना शहरांचे नामांतर प्रस्ताव मांडण्याआधीच काँग्रेसने तीन प्रस्ताव मांडले आहेत. यामध्ये पुण्याचे नाव जिजाऊनगर करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच शिवडी न्हावाशेवा मार्गाला बॅ. ए. आर. अंतुलेंचे नाव द्या, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील नाव द्या असे आणखी दोन प्रस्ताव काँग्रेसने मांडले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात; अविश्वास ठरावावर शिवसेनेचा युक्तीवाद सुरु
आजची ही बैठक नामांतर बैठक ठरणार आहे. कालच्या बैठकीत मंत्री अनिल परब यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर कारावे, उद्याच्या बैठकीत यावर ठराव संमत करावा अशी मागणी केली होती. याचबरोबत उस्मानाबादचे देखील नामांतर प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. या शहराचे नाव धाराशिव असे करण्याची मागणी आहे. ठाकरे सरकारवर बहुमत चाचणीची टांगती तलवार असताना २४ तासांत दुसरी मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कालपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला उपस्थित राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज स्वत: मर्सिडीज चालवत मंत्रिमंडळ बैठकीला गेले आहेत. ते या बैठकीला उपस्थित असतील. दुसरीकडे राज्यपालांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाला ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावरही सुनावणी सुरु आहे. यामुळे आजचा दिवस हायव्होल्टेज ठरणार आहे.