मुंबई-
सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता अशा बातम्या काही माध्यमांमध्ये चालवण्यात येत आहेत. या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन केल्याच्या बातम्या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलतात ते खुलेआम बोलतात कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नये आणि अफवा पसरवू नये, असं एका शिवसेना नेत्यानं स्पष्ट केलं आहे.
पुढील ४८ तासांत काय घडणार?; राज्यात राजकीय घडामोडींना वेग, BJP खासदाराचे संकेत
सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा फोन केला होता, अशी माहिती माध्यमांमध्ये दिली जात होती. ज्या दिवशी एकनाथ शिंदे आणि इतर आमदार सूरतला रवाना झाले त्या दिवशी म्हणजेच २१ जून रोजी ठाकरे-फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर आणखी एकदा दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाली असाही दावा करण्यात येत आहे. पण यात वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं शिवसेना नेत्यानं स्पष्ट केलं आहे.
आम्ही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत- मुनगंटीवार"राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. पण सध्या आम्ही वेट अँड वॉचच्याच भूमिकेत आहोत. आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही", असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
२० हून अधिक आमदार संपर्कात- अनिल देसाईशिवसेना नेते अनिल देसाई यांनी एकनाथ शिंदे गटातील २० हून अधिक आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत. ते मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याच पाठिशी उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर शिंदे गटात खळबळ उडाली आहे. देसाई यांच्यानंतर संजय राऊत यांनीही आज प्रसार माध्यमांशी बोलताना आम्ही आजही गुवाहटीमधील काही आमदारंना बंडखोर मानत नाही. ते मुंबईत परतल्यावर सरकारच्या पाठिशी उभे राहतील, असा दावा संजय राऊत म्हणाले.