शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
3
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
4
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
5
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
6
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
7
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
8
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
9
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
10
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
11
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
12
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
13
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
14
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
15
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
16
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
17
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
18
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
19
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
20
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

लोकसभेसाठी १६-१६-१६ चा फॉर्म्युला ठरला? राऊतांनी वेगळाच आकडा सांगितला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 10:02 AM

मविआचा लोकसभेसाठी १६-१६-१६ जागा वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष आपापल्या ताकदीची चाचपणी सुरु केली आहे.

मविआमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष आपापल्या ताकदीची चाचपणी सुरु केली आहे. असे असताना मविआचा लोकसभेसाठी १६-१६-१६ जागा वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर ठाकरे गट शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

बाहेर सुरु असलेली बातमी चुकीची आहे. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मविआमध्ये सध्या जागा वाटपाची चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. पवारांच्या घरी जी बैठक झाली ती एकत्र लढविण्याच्या चर्चेसाठी होती. कोणी काही म्हणूदेत आघाडी एकत्रच लढणार आहे.  आमचे १९ खासदार लोकसभेत राहतील, असे राऊत यांनी सांगितले. 

गेल्यावेळी लोकसभेला राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने जरी एक जागा जिंकली असेल तरी ती त्यांच्याकडेच राहिल. यामुळे जिंकल्यानंतर कोण कुठे गेला यावर जागावाटप ठरणार नाही. दादरा नगर हवेलीचा एक खासदार आमचा आहे, महाराष्ट्रात १८ जागा जिंकल्या होत्या. मी एवढेच सांगेन की लोकसभेत आमचे १९ खासदार असतील, असे राऊत म्हणाले. 

सुषमा अंधारेंना मारहाण झाल्याच्या घटनेवर राऊतांनी बीडमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या नेत्या आहेत. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. यामुळे तात्काळ कारवाई करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

फडणवीसांना प्रत्यूत्तरभाजपाच्या कार्यकारणीच्या सभेतील फोटो पाहिले तर कोणी झोपलेय, कोणी जांभया देतेय कोणी आणखी काय करतेय. अशा मरगळलेल्या लोकांसमोर फडणवीस आम्हाला कसले पोपट मेल्याचे टोले देत होते, अशी टीका राऊत यांनी केली. विधानसभा अध्यक्ष महात्मा आहेत. त्यांच्याकडून चांगल्या कायदेशीर निकालाची आम्हाला अपेक्षा आहे. फडणवीस म्हणत होते, पोपट मेलाय, आता पोपट कुणाचा उडतोय हे दिसेल. वाघाचे बोलताय ते महापालिकेची ताबडतोब निवडणूक घ्या, मग बघा. बालाजी कल्याणकर हे सरपंच व्हाय़च्या लाय़कीचे नव्हते, त्यांना शिवसेनेने आमदार केले, अशी टीका राऊत यांनी केली.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना