Sharad Pawar ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार आहे. दरम्यान, उमेदवारीसीठी खासदार शरद पवार यांना भेटण्यासाठी इच्छुक नेत्यांची गर्दी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभेत भाजपाला मदत केलेल्या अभिजीत पाटील यांनी काही दिवसापूर्वी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. आज त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी पवार यांची भेट घेतली, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
जून महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी आधी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. नंतर काही दिवसांनी त्यांनी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. यामुळे विधानसभा निवडणुकीला पाटील पुन्हा एकदा भाजपाला मदत करतील अशी चर्चा होती. पण, काही दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली, यावेळी त्यांनी माढा विधानसभेची उमेदवारीची मागणी केल्याची चर्चा सुरू आहे. तर आता आज पुन्हा एकदा खासदार शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली.
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
अभिजीत पाटील हे विठ्ठल सहकारी संघाचे अध्यक्ष आहेत. यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात त्यांचीही ताकद आहे. यामुळे त्यांनीही विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून माढ्यात भेटीगाठी वाढवल्या आहेत. प्रचार सुरू केल्याची चर्चा आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या गटातील बबनदादा शिंदे यांनीही तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसापूर्वीच बबनदादा शिंदे यांनी विधानसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यांनी मुलगा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनीही पवारांकडे उमेदवारीची मागणी केली होती.
माढा विधानसभा मतदारसंघात तीन तगडे नेते इच्छुक
माढ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यासाठी तीन बडे नेते इच्छुक असल्याचे समजते. यामध्ये विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे, भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा समावेश आहे.