Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे विधानसभेपूर्वीच राजकीय वर्तुळात भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता आमदार बच्चू कडू यांनीही याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमधून बाहेर पडतील असं विधान कर बच्चू कडू यांनी तसे संकेत असल्याचे म्हटले आहे. गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज आमदार बच्चू कडू यांनीही याबाबत वक्यव्य केले.
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
आज पत्रकार परिषदेत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले. पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू यांनी माध्यम प्रतिनिधींनी पंकजा मुंडे यांच्याबाबात प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, पंकजा मुंडे यांचे खरं आहे, विधानसभेत आता धनंजय मुंडे आहेत. अजित पवार जर महायुतीतून बाहेर गेले तर त्यांची जागा त्यांना मिळेल. नाही गेले तर पंकजा मुंडे यांना जागा मिळणार नाही. सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बऱ्याच फुटफाट होईल असं चित्र वाटत आहे. ते बाहेर पडतील आणि आमची महाशक्ती होईल. त्यांना आमच्या आघाडीत घ्यायचं की नाही हे आमची सुकाणु समिती ठरवेल, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. ते महायुतीमधून बाहेर पडतील असे काही संकेत आहेत. जसे तुमचे सुत्र असतात तसे आमचेही सुत्र आहेत, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
'दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये'
मनोज जरांगे पाटील यांचं आता तिसर, चौथ उपोषण आहे. या आरक्षणाबाबत जो काही घोळ केला आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. याच मुळात काय कारण आहे ते शोधल पाहिजे. केंद्रात सरकार तुमचं आहे, केंद्रात तुम्ही दहा टक्के वाढवून घ्या. सरकारने आता या भूमिका घेतल्या पाहिजेत. आता कोर्टात टीकेल का नाही हे माहित नाही. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा अशी दरी निर्माण होत आहे. ओबीसी समाजाला विश्वास देणे महत्वाचे आहे. राजकारणाठी दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.