'2024 मध्ये अजित पवारांचाच करेक्ट कार्यक्रम होणार'; भाजप प्रदेशाध्यक्षांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 02:11 PM2022-12-28T14:11:57+5:302022-12-28T14:12:40+5:30

'अजितदादांच्या ऐवजी जयंत पाटलांना विरोधीपक्ष नेतेपद मिळायला हवं होतं.'

maharashtra politics: 'Ajit Pawar will loose In 2024 '; Criticism of BJP state president Chandrashekhar Bawankule | '2024 मध्ये अजित पवारांचाच करेक्ट कार्यक्रम होणार'; भाजप प्रदेशाध्यक्षांचे टीकास्त्र

'2024 मध्ये अजित पवारांचाच करेक्ट कार्यक्रम होणार'; भाजप प्रदेशाध्यक्षांचे टीकास्त्र

googlenewsNext


मुंबई: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर खोचक टीका केली होती. 'मी जर मनावर घेतलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल', असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.

चंद्रशेखर बानकुळे आज मुंबईत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'अजितदादांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. मला वाटलं होतं त्यांच्यात हिंमत आहे. मी एकच दौरा केला तर माझा करेकट कार्यक्रम करायला निघाले. पवार कुटुंबिांबाबात बारामतीत नाराजी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल,' अशी टीका बावनकुळे यांनी केली.

ते पुढे म्हणाले, 'अजितदादा कधी रडतात तर कधी 8 दिवस फोन बंद करून पळून जातात. दादांना नेहमी क्रिम पोस्ट मिळत आल्या आहेत. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, विरोधीपक्ष नेते हे योग्य नाही. त्यांच्या जागी जयंत पाटील याना संधी मिळयला हवी होती,' असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच, 'ओबीसी आरक्षणाची फाईल अजितदादांनी फेकून दिली होती', असा आरोपही बावनकुळेंनी केला. 
 

Web Title: maharashtra politics: 'Ajit Pawar will loose In 2024 '; Criticism of BJP state president Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.