मुंबई: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर खोचक टीका केली होती. 'मी जर मनावर घेतलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल', असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.
चंद्रशेखर बानकुळे आज मुंबईत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'अजितदादांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. मला वाटलं होतं त्यांच्यात हिंमत आहे. मी एकच दौरा केला तर माझा करेकट कार्यक्रम करायला निघाले. पवार कुटुंबिांबाबात बारामतीत नाराजी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल,' अशी टीका बावनकुळे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, 'अजितदादा कधी रडतात तर कधी 8 दिवस फोन बंद करून पळून जातात. दादांना नेहमी क्रिम पोस्ट मिळत आल्या आहेत. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, विरोधीपक्ष नेते हे योग्य नाही. त्यांच्या जागी जयंत पाटील याना संधी मिळयला हवी होती,' असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच, 'ओबीसी आरक्षणाची फाईल अजितदादांनी फेकून दिली होती', असा आरोपही बावनकुळेंनी केला.