वादग्रस्त वक्तव्ये टाळा! अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 10:11 AM2024-09-19T10:11:34+5:302024-09-19T10:12:06+5:30
Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपात ७० हून अधिक जागांवर दावा करण्याचा निर्णयही झाल्याचे समजते.
Maharashtra Politics ( Marathi News ) : मुंबई : भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात असली तरी आपल्या नेत्यांनी तशी वक्तव्ये टाळावीत, अशी सूचना अजित पवार गटाने पदाधिकाऱ्यांना केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, मंत्री आणि आमदारांची बैठक पार पडली. यावेळी विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही; तसेच महायुतीच्या जागावाटपात ७० हून अधिक जागांवर दावा करण्याचा निर्णयही झाल्याचे समजते.
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
या बैठकीला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह मंत्री आणि आमदार उपस्थित होते. या बैठकीला चार आमदार अनुपस्थिती असल्याचे समजते. मात्र या आमदारांनी तशी पूर्वपरवानगी घेतली होती. यात इंद्रनील नाईक यांच्या मतदारसंघात बुधवारी गणपती विसर्जन होते, तर नबाव मलिक यांच्या जावयाचा अपघात झाल्याने ते बैठकीला आले नव्हते.