शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

फडणवीस तातडीने दिल्लीला निघाले; सत्तेबाहेर राहण्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या भूमिकेवर ठाम, मनात काय... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 1:25 PM

Devendra Fadanvis Latest News: नागपूर विमानतळावर फडणवीसांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. कार्यकर्त्यांच्या गराड्यात फडणवीस विमानतळावर पोहोचले.

महाराष्ट्रात झालेल्या भाजपच्या पर्यायाने महायुतीच्या दारुण पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती भाजपच्या नेत्यांना केली होती. यावरून फडणवीसांची मनधरणी सुरु झाली असून अनेक नेत्यांनी त्यांना राजीनामा देऊ नका, असे सांगितले आहे. तरीही फडणवीस ठाम असल्याचे वृत्त आहे. अशातच फडणवीस हे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी नागपूरहून दिल्लीला निघाले आहेत. 

नागपूर विमानतळावर फडणवीसांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. कार्यकर्त्यांच्या गराड्यात फडणवीस विमानतळावर पोहोचले. सरकारमध्ये राहण्यापेक्षा बाहेर राहण्याची भुमिका फडणवीसांनी जेव्हा शिंदेंना फोडले व सत्ता स्थापन केली तेव्हाच मांडली होती. आता लोकसभेला राज्यात मोठा पराभव झाल्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसांनी ही भुमिका घेतली आहे. तेव्हा केंद्रातून निरोप आल्याने फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. 

 भाजपाचे राज्यातील सगळेच नेते, राजीनामा देऊ नका, म्हणून त्यांची मनधरणी करत असले, तरी स्वतः फडणवीस आपला निर्णय बदलण्याची शक्यता नसल्याचं समजतं. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाला लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची किनार नक्कीच आहे, पण विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवून ते मंत्रिमंडळातून बाहेर पडू इच्छितात असे मानले जाते आहे. राज्यातील शिंदे सरकारला आणखी चार महिने राहिले. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागेल. या चार महिन्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री राहण्यापेक्षा पक्षासाठी झोकून काम करण्याचा मानस फडणवीस यांनी पक्का केल्याचं निकटवर्तीय सांगतात.

अशातच फडणवीसांच्या या भुमिकेमुळे भाजप श्रेष्ठीदेखील टेन्शनमध्ये असून अमित शहा यांनी तातडीने फडणवीसांना दिल्लीत येऊन बोला, असा निरोप दिला आहे. आता फडणवीस उपमुख्यमंत्री राहतात की भाजपाचे पुन्हा प्रदेशाध्यक्ष होतात याची चर्चा रंगू लागली आहे. 

पत्रकार परिषदेनंतर काय झालं?उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. त्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वास्तविक, पत्रकार परिषदेपूर्वी भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची एक बैठक प्रदेश कार्यालयातील वरच्या माळ्यावरील सभागृहात झाली. त्या बैठकीत फडणवीस म्हणाले की, राज्यातील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचं मी पत्रपरिषदेत जाहीर करणार आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह दोन नेत्यांनी, असं न करण्याचं मत मांडलं. पराभव काही तुमच्यामुळे झालेला नाही, ही सामूहिक जबाबदारी असते, तुम्ही एकट्याने जबाबदारी घेण्याची गरज नाही, असं त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण, फडणवीस जबाबदारी स्वीकारण्यावर ठाम राहिले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAmit Shahअमित शाहmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४