शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Politics : 'महाराष्ट्राची संस्कृती आम्हाला शिकवू नका...', पोटनिवणुकीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 14:52 IST

Maharashtra Politics : 26 फेब्रुवारी रोजी कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे.

Maharashtra Politics : पुढील महिन्यात राज्यात दोन मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघातील भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या अकाली निधनानंतर या दोन्ही जागांवर पोटनिवडणुक होणार आहेत. या दोन्ही ठिकामी बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

या दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केले आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे मातोश्रीवर आले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे. महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी,' असे आमचे मत आहे.

आम्हाला शिकवू नये...एकनाथ शिंदेंच्या आवाहनावर राऊत म्हणाले की, 'महाराष्ट्राची संस्कृती-परंपरा काय आहे, हे आम्हाला शिकवू नये. राज्यात परंपरेची रोज पायमल्ली होते, हे वेगळं सांगायला नको. पंढरपूर आणि नांदेड पोटनिवडणुकीत ही संस्कृती दिसली नाही. फक्त अंधेरीची निवडणूक बिनविरोध झाली.  त्याची कारणं वेगळी आहेत, तिथं भाजपला जिंकण्याची संधी नव्हती,' असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतElectionनिवडणूकBJPभाजपाkasba-peth-acकसबा पेठpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड