Maharashtra Politics: 'आज लोकमान्य टिळक असते तर सरकारला...' नाना पटोलेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 05:15 PM2023-02-06T17:15:21+5:302023-02-06T17:15:27+5:30
Maharashtra Politics: 'लोकशाहीची थट्टा करणाऱ्या सरकारला कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकित आस्मान दाखवाये.'
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरुन राज्यातील राजकारण तापले आहे. एकीकडे भाजपकडून या दोन्ही जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे विरोधकांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशातील परिस्थितीवरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अदानी समूहावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा काँग्रेसच्यावतीने पुण्यातील टिळक चौकातील एलआयसी कार्यालयाजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी पटोले म्हणाले, 'देशातील सर्वसामान्यांचे पैसे मोदींनी त्यांच्या मित्रांना दिले. अडानीने खोट्या कपंन्या दाखवून एलआयसी, एसबीआयमधील पैसे लुटले. या संस्था लोकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी होत्या. 8 वर्षात मागे असणारा अडानी हा जागतिक पातळीवर थेट दुसऱ्या क्रमांचा श्रीकांत व्यक्ती बनला. हिंडनबर्ग अहवालातून अडानी चा खोटेपणा पुढे आला. मोदी सरकारला हे अडानी सारख्या मित्राला वाचविण्याची धडपड करीत आहेत,' असा आरोप पटोले यांनी केला.
ते पुढे म्हणाले, 'सगळ्या सरकारी संस्था मोदींच्या मित्रांच्या ताब्यात आहेत. लोकशाही मानणारे हे सरकार असेल तर त्यांनी न्याय व्यवस्थेत अडचण आणू नये. देशातील नागरिकाला गरीब करून गुलाम बनविण्याचे काम सुरू आहे. आम्ही इंग्रजांना आम्ही घाबरलो नाही, मग फडणवीस, अमित शहा यांच्या पोलिसांच्या दबावांना आम्ही घाबरणार नाही. अडानी च्या ताब्यात चौथा स्तंभ ही देण्याचा प्रयत्न होत आहे. जनतेच्या एका एका पैशाचा हिशोब आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही,' असंही नाना म्हणाले.
'आज टिळक असते तर त्यांनी मोदी सरकारवर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असा जाब विचारला असता. राहुल गांधी यांचा आवाज हा गरीबांचा आहे. लोकशाही मानने काँग्रेसचा धर्म आहे, तर न मानाने भाजपचा धर्म आहे. कोणतीच व्यवस्था लोकशाही मार्गाने चाललेली नाही. वाचलेली लोकशाही दाखविण्याचा प्रयत्न कसबा विधानसभा पोट निवडणुकीतून दाखवून द्यायचे आहे. हा मतदार संघ भाजप स्वतःच्या मालकीचा समजतो आहे, ते काँग्रेसच्या बाजूने निकाल देऊन दाखवून द्यावे,' असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.