शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

"एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार, राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार", संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 3:54 PM

''शपथविधीवेळी शिंदे गटाचे नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. आता कोणतीही पळवाट त्यांना वाचवू शकत नाही.''

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांचे सर्व आमदार अपात्र ठरणार आणि राज्याला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घटली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपध घेतली. म्हणजेच आता राष्ट्रवादीदेखील सत्तेत सामील झाली आहे. यावरुन संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले संजय राऊत?

यावेळी संजय राऊत म्हणाले, "मी याला भूकंप वैगरे मानत नाही. काही गोष्टी या राजकारणात घडणार होत्या, त्या आज घडल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की, जे सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार आहे, ते अस्थिर आहे. 165 आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा ते करतात, पण त्यांना अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची गरज लागते. याचा अर्थ मी असा काढतो की, सर्वोच्च न्यायालयाने शिंदेगटाबाबत निवाडा दिला आहे, घटनाबाह्य सरकार म्हटले आहे, ते योग्य आहे. "

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत"आजच्या शपथविधीचा अर्थ म्हणजे एकनाथ शिंदेंसह प्रथम 16 आणि नंतर सर्व आमदार अपात्र ठरणार आहेत. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाण्याची सुरुवात झाली आहे. यामुळेच भाजपने आता हे नवीन टेकू घेतलं आहे. कोणावर काय आरोप, काय खटले सुरू होते, यात मला पडायचे नाही. पण, यातले अनेक लोक असे आहेत, ज्यांच्याविरोधात भाजपने मोहिम राबवली होती. त्यांचे आता भाजप काय करणार, हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे फारकाळ मुख्यमंत्रिपदावर राहत नाहीत, त्यांचे आमदारही अपात्र ठरतील, हे आजच्या शपथविधीवरुन स्पष्ट होते," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

आम्ही पुन्हा जोमाने उभं राहूते पुढे म्हणाले की, "माझं शरद पवारांशी बोलणं झालं आहे, ते खंबीर आहेत. उद्धव ठाकरेंनीदेखील शरद पवारांशी चर्चा केली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते, आम्ही पुन्हा उभं राहू. राज्यातल्या लोकांचा या सगळ्यांना अजिबात पाठींबा नाही. जे शिवसेनेच्या बाबतीत घडवलं गेलं, राष्ट्रवादीच्या बाबतीत घडवंल गेलं, त्याला जनता पाठींबा देणार नाही."

राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार"गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता, हा विस्तार शिंदेंच्या वेळेस व्हायला हवा होता. पण, आज या शपथविधीवरुन वेगळाच अर्थ निघतोय. अजित पवारांसह इतर नेत्यांच्या शपथविधीवेळी शिंदे गटाचे नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. त्यांच्या वेदना मी समजू शकतो. पण, आता कोणतीही पळवाट त्यांना वाचवू शकत नाही. या राज्याला परत एक नवा मुख्यमंत्री मिळू शकतो," असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष