Maharashtra Politics ( Marathi News ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या युतीसाठी हात पुढे केला आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनीही सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. दरम्यान, आता संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुन्हा एकदा युतीबाबत संकेत दिले आहेत.
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनसे आणि शिवसेना युतीबाबत भाष्य केले. खासदार राऊत म्हणाले, राज ठाकरेंनी हात पुढे केला आहे आणि त्याला प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. आपण येथेच थांबायला हवे. काही दिवस जाऊ द्या. मनसे प्रमुख मुंबईत नाहीत. त्यांना मुंबईत येऊ द्या.त्यानंतर आपण सगळे चर्चा करू. रोज यावर चर्चा करून त्या विषयाचे गांभीर्य का घालवायचे? लोकांच्या मनातल्या भावना आहेत. हा विषय जिवंतच राहणार आहे, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.
"उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीने चर्चा करण्याची गरज नाही. या दोघांचे नाते काय? हे मला माहित आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात. उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत, असंही राऊत म्हणाले.
आम्ही बराच काळ एकत्र काम केलं: राऊत
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आम्ही बराच काळ एकत्र काम केलं आहे. दोन भाऊ भेटणार असतील तर भेटूद्या, आम्ही त्यांच्यासोबत आहोत.मी तर दोन्ही घरचा पाहुणा आहे.राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले. महाराष्ट्रातल्या राजकारणातील कटुता भाजपाने निर्माण केली आहे, अशी टीकाही राऊतांनी केली.