"स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी; आम्ही हिंदुत्व सोडलं, मग आज भाजपाने काय केलं?"- आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 08:24 PM2023-07-02T20:24:27+5:302023-07-02T20:30:45+5:30

"एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे."

Maharashtra Politics: "Selfish versus self-respect; we left Hindutva, so what did BJP do today?"- Aditya Thackeray | "स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी; आम्ही हिंदुत्व सोडलं, मग आज भाजपाने काय केलं?"- आदित्य ठाकरे

"स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी; आम्ही हिंदुत्व सोडलं, मग आज भाजपाने काय केलं?"- आदित्य ठाकरे

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आज एक दुसऱ्यांदा मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी केली. ते बंडखोरी करत आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांसह शिवसेना नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिल्या. आदित्य ठाकरे यांनीदेखील आजच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार टीका केली.

शरद पवार कामाला लागले, बुधवारी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक; जयंत पाटलांची माहिती

आदित्य ठाकरे यांनी दिवसभरातील घडामोडीनंतर सायंकाळी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. "आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न - मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं?? रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??" असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

'साहेबांनी आमदार निवडून आणायचे, पावसात भिजायचं अन् तुम्ही...' आव्हाडांचे बंडखोरांवर टीकास्त्र

ते पुढे म्हणाले, "एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “१४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला?? आणि सर्वात महत्वाचं... आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं?? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना! एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! 'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी', अशी ही लढाई असणार आहे!" अशी टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Maharashtra Politics: "Selfish versus self-respect; we left Hindutva, so what did BJP do today?"- Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.