Sharad Pawar ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आता खासदार शरद पवार यांनी मंत्री तानाजी सावंत यांना धक्का दिला आहे. सावंत यांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता स्वत: अनिल सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
अनिल सावंत यांनी दोन वेळा खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावर बोलताना अनिल सावंत म्हणाले, " मी पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघाची मागणी केली आहे. माझ्याकडे शिवसेनेचं कोणतही पद नव्हतं, पण माझी निवडणूक लढवायची इच्छा आहे. मला शरद पवार साहेबांची विचार पटत आहेत. म्हणून मी उमेदवारीची मागणी केली आहे, असंही अनिल सावंत म्हणाले.
"मी उमेदवारीबद्दल अजून मंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत चर्चा केलेली नाही. मी पंढरपूर, मंगळवेढ्यात मोठं काम केलं आहे. शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. पंधरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी साखर कारखाना चालवत आहे. मी बाहेरचा उमेदवार नाही, या ठिकाणी अनेक वर्षापासून काम करतोय, त्यामुळे मला खासदार शरद पवार साहेब मला उमेदवार म्हणून देतील असा विश्वास मला आहे, असंही सावंत म्हणाले.
"आता आम्ही कार्यकर्त्यांसोबतच चर्चा करुन उमेदवारी बाबत निर्णय घेणार आहे. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशावरही निर्णय घेणार आहे, असंही सावंत म्हणाले.