Maharashtra Politics ( Marathi News ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असं विधान मंत्री नितेश राणे यांनी केले होते. या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'जनतेच्या मनातील आमदार..' धंगेकरांच्या रासनेंविरोधातील बॅनरबाजीने महायुतीत धुसफूस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य महाराष्ट्राला परवडणारे नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते, असे म्हणत अजित पवार यांनी नितेश राणेंना इतिहास वाचण्याचाही सल्ला दिला. दरम्यान, आता आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक्सवर एक पोस्ट करुन मुस्लिम सरदारांची यादी शेअर केली आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स एक यादी पोस्ट केली आहे. या यादीमध्ये छत्रपती शिवराय यांच्या सैन्यामध्ये असलेल्या मुस्लिम सैन्याच्या नावांची यादी दिली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मिटकरी यांनी कॅप्शनध्ये, माननीय मंत्र्यांनी वाचावे असे', अशी कॅप्शन दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत मुस्लीम सरदार
१) सिद्दी हिलाल घोडदळातील सेनापती सहाव्यक
२) सिटी बाहबाद: घोडदळातील सरदार
३) सिद्दी इब्राहिम: शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा इजारी, पोंक्धाचा किल्लेदार
४) नूरखान वेग स्वराज्याचा पहिला सरनीथत
५) मदारी मेहतर महाराजांचा विश्वासू सेयक40%
६) काही देवर महाराजांचा चकिल / सचिव
७) रामाखान: सरदार
८) सिद्दी अंबर वहाय हवालदार
९) दुसेनखान मियाना लष्करात अधिकारी
१०) कस्तमेजमान महाराजांचा खास मित्र
११) वर्यासारंग: आरमाराचा पहिला सुभेदार
१२) इब्राहिमखान: आरमारातील अधिकारी
१३) दौलतखान: आरमार प्रमुख (सुभेदार)
१५) सुलतानखान आरमाराचा सुभेदार
१६) दाऊलखान: आरमारातील सुभेदार
१७) इब्राहिमखान: तीपत्खान्याचा प्रमुख
१८) विजापूर व गीचा स्वराज्यात आलेले ५०० पाण पायदळ व घोडदबात
१९) घीहदबातील चार पयके मोगली चाकी सीतूनस्वराज्यात आली पाचदक व घोडदळात