शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

महाराष्ट्राभिमानाचा नवा हुंकार ! सन्मान संध्येचे चौथे पर्व

By admin | Published: April 06, 2017 6:42 AM

"लोकमत" समाजाला दिशा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे,

 14 क्षेत्रांतील सेवाव्रतींचा होणार गौरव

 

समाजातील घडामोडींचे वास्तव मांडत, आपल्या वेदनेच्या हुंकाराला न्याय देणारा "लोकमत" समाजाला दिशा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे, "लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्काराच्या रुपात ! यंदाच्या संभाव्य विजेत्यांच्या चर्चेबरोबरच "जय महाराष्ट्रीयन"चा हुंकार पुन्हा घुमू लागला आहे. नामांकितांबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची आता परंपरा होऊ पाहात आहे. यंदाच्या चौथ्या पर्वातही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयनांना प्रगतीपथावर नेणाऱ्यांमधून लोकमत"महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, राज्यभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून साकारत आहे.

विविध आवृत्यांच्या क्षेत्रातील कर्तृत्ववान पण अप्रकाशित व्यक्तिमत्वांचा शोध आणि माहिती घेऊन तयार झालेल्या विस्तृत यादीतून लोकमत मीडिया लि.चे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संपादकीय मंडळाच्या बैठकीत साकल्याने चर्चा होऊन बारा क्षेत्रांतील नामांकनासाठी संपादकीय चमूने शिफारस केलेल्या नावातून प्रत्येक क्षेत्रातील किमान पाच नावे ज्युरींच्या विचारार्थ देण्यासाठी निवडण्यात आली. नामांकन प्राप्त व्यक्तिंना महाराष्ट्रभरातील वाचकांनी एसएमएस आणि फेसबुकद्वारे दिलेली पसंती तसेच आठ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरणार आहेत.

प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध घेतला गेला. पुरस्काराच्या या चौथ्या पर्वात जबाबदारी आणखी वाढली आहे. याचे भान राखत आणि समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांचा आरसा म्हणून "लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जाईल.

समाजमनाचा आरसा असलेल्या "लोकमत"ने समाजप्रक्रियेत सकारात्मक बदल घडविणाऱ्या आणि प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.

---------------------------------------

गौरवशाली इतिहास लाभलेल्या आपल्या राज्याला आज अनेक क्षेत्रांत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आव्हाने मोठी असली तरी त्याने खचून न जाता दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून अनेक लोक कार्यरत आहेत. अशांच्या कार्याचा यथोचित गौरव करीत असतानाच त्यांच्याविषयी महाराष्ट्राच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना त्यामागे आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कर्तृत्त्ववान मान्यवरांचा सन्मान करतानाच इतरांसाठी प्रेरणेचा स्त्रोत ठरू शकणाऱ्या पण, प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या कानकोपऱ्यातील माणसांचाही भाषा-वेशभूषा, संस्कार-संस्कृती, जात-पात यांच्यापलीकडे जाऊन गुणगौरव करण्याचा वसा आम्ही घेतला आहे.

- खा. विजय दर्डा, अध्यक्ष, लोकमत मीडिया लि.

हे आहेत यंदाचे ज्युरी 

नितीन गडकरी - द्रष्टा व निर्णयक्षम राजकारणी. देशातील पायाभूत सुविधांचा आधुनिक विश्वकर्मा.

मिलिंद देवरा - माजी खासदार व नव्या पिढीचा सुशिक्षित- सुसंस्कृत चेहरा. काँग्रेसमधील मृदुभाषी तरुण तुर्क.

अर्णब गोस्वामी - भारतातील टेलिव्हिजन पत्रकारितेला नवा जागतिक आयाम देणारा आक्रमक पत्रकार.

महेश भट - सर्जनशील सिने दिग्दर्शक आणि संवेदनशील भाष्यकार.

डॉ. प्रकाश आमटे - उपेक्षित-वंचितांना प्रकाशवाटा दाखविणारा सामाजिक दीपस्तंभ.

डॉ. रमाकांत पांडा- रुग्णांच्या ह्रदयाची हाक ऐकण्याचे सामर्थ्य `सर्जन`शील हातांना देणारा किमयागार जीवनदाता.

सुनील सूद - कम्युनिकेशनच्या प्रांतातील आधुनिक संवाददूत. व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक.

विक्रम श्रॉफ - तंत्रज्ञानातून शेतीला नवसंजीवनी आणि समृद्ध आयाम देणा-या युपीएल चे कार्यकारी संचालक.

विक्रम लिमये - लेखा परीक्षणातील कौशल्यातून उद्योगांना नवा अर्थ देणारा शिल्पकार. आयडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीइअओ.

 

मृणाल कुलकर्णी - बौद्धिक वारशाला अभिनय व दिग्दर्शनाचे कोंदण लाभलेला सुसंस्कृत चेहरा.