शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

महाराष्ट्राभिमानाचा नवा हुंकार ! सन्मान संध्येचे चौथे पर्व

By admin | Published: April 04, 2017 4:36 PM

सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे, "लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्काराच्या रुपात. अधिक माहितीसाठी बघा lmoty.lokmat.com

14 क्षेत्रांतील सेवाव्रतींचा होणार गौरवसमाजातील घडामोडींचे वास्तव मांडत, आपल्या वेदनेच्या हुंकाराला न्याय देणारा "लोकमत" समाजाला दिशा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे, "लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्काराच्या रुपात ! यंदाच्या संभाव्य विजेत्यांच्या चर्चेबरोबरच "जय महाराष्ट्रीयन"चा हुंकार पुन्हा घुमू लागला आहे. नामांकितांबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक कराया भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची आता परंपरा होऊ पाहात आहे. यंदाच्या चौथ्या पर्वातही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयनांना प्रगतीपथावर नेणाऱ्यांमधून लोकमत"महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, राज्यभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून साकारत आहे. विविध आवृत्यांच्या क्षेत्रातील कर्तृत्ववान पण अप्रकाशित व्यक्तिमत्वांचा शोध आणि माहिती घेऊन तयार झालेल्या विस्तृत यादीतून लोकमत मीडिया लि.चे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संपादकीय मंडळाच्या बैठकीत साकल्याने चर्चा होऊन बारा क्षेत्रांतील नामांकनासाठी संपादकीय चमूने शिफारस केलेल्या नावातून प्रत्येक क्षेत्रातील किमान पाच नावे ज्युरींच्या विचारार्थ देण्यासाठी निवडण्यात आली. नामांकन प्राप्त व्यक्तिंना महाराष्ट्रभरातील वाचकांनी एसएमएस आणि फेसबुकद्वारे दिलेली पसंती तसेच आठ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरणार आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध घेतला गेला. पुरस्काराच्या या चौथ्या पर्वात जबाबदारी आणखी वाढली आहे. याचे भान राखत आणि समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांचा आरसा म्हणून "लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जाईल.समाजमनाचा आरसा असलेल्या "लोकमत"ने समाजप्रक्रियेत सकारात्मक बदल घडविणाऱ्या आणि प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे. ---------------------------------------गौरवशाली इतिहास लाभलेल्या आपल्या राज्याला आज अनेक क्षेत्रांत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आव्हाने मोठी असली तरी त्याने खचून न जाता दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून अनेक लोक कार्यरत आहेत. अशांच्या कार्याचा यथोचित गौरव करीत असतानाच त्यांच्याविषयी महाराष्ट्राच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना त्यामागे आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कर्तृत्त्ववान मान्यवरांचा सन्मान करतानाच इतरांसाठी प्रेरणेचा स्त्रोत ठरू शकणाऱ्या पण, प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या कानकोपऱ्यातील माणसांचाही भाषा-वेशभूषा, संस्कार-संस्कृती, जात-पात यांच्यापलीकडे जाऊन गुणगौरव करण्याचा वसा आम्ही घेतला आहे. - खा. विजय दर्डा, अध्यक्ष, लोकमत मीडिया लि.

हे आहेत यंदाचे ज्युरी 

नितीन गडकरी - द्रष्टा व निर्णयक्षम राजकारणी. देशातील पायाभूत सुविधांचा आधुनिक विश्वकर्मा.

मिलिंद देवरा - माजी खासदार व नव्या पिढीचा सुशिक्षित- सुसंस्कृत चेहरा. काँग्रेसमधील मृदुभाषी तरुण तुर्क.

अर्णब गोस्वामी - भारतातील टेलिव्हिजन पत्रकारितेला नवा जागतिक आयाम देणारा आक्रमक पत्रकार.

महेश भट - सर्जनशील सिने दिग्दर्शक आणि संवेदनशील भाष्यकार.

डॉ. प्रकाश आमटे - उपेक्षित-वंचितांना प्रकाशवाटा दाखविणारा सामाजिक दीपस्तंभ.

डॉ. रमाकांत पांडा- रुग्णांच्या ह्रदयाची हाक ऐकण्याचे सामर्थ्य `सर्जन`शील हातांना देणारा किमयागार जीवनदाता.

सुनील सूद - कम्युनिकेशनच्या प्रांतातील आधुनिक संवाददूत. व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक.

विक्रम श्रॉफ - तंत्रज्ञानातून शेतीला नवसंजीवनी आणि समृद्ध आयाम देणा-या युपीएल चे कार्यकारी संचालक.

विक्रम लिमये - लेखा परीक्षणातील कौशल्यातून उद्योगांना नवा अर्थ देणारा शिल्पकार. आयडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीइअओ.

 

मृणाल कुलकर्णी - बौद्धिक वारशाला अभिनय व दिग्दर्शनाचे कोंदण लाभलेला सुसंस्कृत चेहरा.