शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Maharashtra Rain Live Updates : मुंबईत पावसाचे धुमशान, ठाण्यात उपवन तलाव ओव्हरफ्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 9:37 AM

दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे.

मुंबई, ठाणे, रायगडसह राज्यातील काही भागाला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोकणातील  १८ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूर्वविदर्भाचा संपर्क तुटलेला आहे. विदर्भातील गोसेखुर्द आणि खान्देशातील गिरणा व हतनूर धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. रायगड जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे पथक, आपदा मित्र, प्रशासन सज्ज झाले आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळल्याची दुर्देवी घटना घडली.

जाणून घ्या राज्यातील पावसाचे अपडेट्स...

मुसळधार पावसात मुंबईची मेट्रो सुपर फास्टमुंबई : दिवसभर पावसाचे  धुमशान सुरु असताना मुंबई मेट्रो विनाव्यत्यत सुरळीत सुरु होती. यामुळे बहुतांश मुंबईकरांनी मुंबई मेट्रोला पसंती दाखवली आणि त्याने प्रवास केला. मुंबई मेट्रो २ अ आणि ७ या दोन्ही मार्गिकेने काल एका दिवसात तब्बल २ लाख १४ हजारांच्या पलीकडे प्रवासी आकडा पार केला. मुंबई मेट्रोने मान्सून पूर्व  केली होती आणि त्याचाच प्रत्यय कालच्या मुसळधार पावसात मुंबईकरांना आला. सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या  २ लाखाच्या वर गेली होती. काल २ लाख, १४ हजाराहून अधिक प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करत स्वतःचा रेल्वे आणि वाहतूक कोंडीपासून बचाव केला.

भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, अनेक जण दबल्याची भीतीमुसळधार पावसामुळे भाईंदरमध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास नवकिर्ती प्रिमायसेस को. हॅा. सोसायटीत ही घटना घडली. इमारतीचा तळमजला आणि पहिल्या मजल्याचा पुढील भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ धाव घेत काही लोकांना बाहेर काढले आहे. अग्नीशमन दल, पोलीस पथक घटनास्थळी दाखल असून, युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु आहे.

- सांगलीत जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात दि. १ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस मिलिमीटरमध्ये : मिरज ५.९ (८९.९), जत १.१ (७१.७), खानापूर ५ (६६.१), वाळवा १८.४ (१०२), तासगाव ६.९ (१०६.६), शिराळा ४१ (२८८.५), आटपाडी १ (६५.५), कवठेमहांकाळ २.१ (७३.१), पलूस १४.२ (८२.९), कडेगाव ९.७ (७८.२).

- सांगलीत कृष्णेची पाणीपातळी दिवसात सहा फुटाने वाढलीसांगली : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळत होता. पण, गुरुवारी सकाळी सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्याच्या काही भागात उघडीप दिली आहे. कृष्णा नदीची दिवसात सहा फूट पाणीपातळी वाढून गुरुवारी १२ फूट ६ इंच झाली आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. 

- मुसळधार पावसामुळे ठाण्यातील उपवन तलाव ओव्हरफ्लोठाणे : गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ठाण्यातील आकर्षणाचे एक केंद्र असणारा उपवन तलाव ओव्हरफ्लो झाला. तलावाच्या आजुबाजूस परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून ठाणे महापालिका प्रशासनाने तलावाच्या आस पास जाण्यास मनाई केली. दोन दिवसांत तब्बल 315 मिलिमीटर पाऊस पडल्याने तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील बऱ्याच तलावांत मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढलेला आहे.

- पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ता खचून पाईपलाईन फुटली; पोलीस, महापालिका विभाग घटनास्थळी

महाबळेश्वरला ३३१ मिलीमीटरची नोंदसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असून गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ३३१ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरण पाणीसाठ्यात सवा सहा टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे सकाळच्या सुमारास धरणात ३७.३६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

ठाण्यात 24 तासांत 214 मिलीमीटरची पावसाची नोंद!ठाणे : ठाणे शहर आणि परिसरात रात्री पासून पुन्हा पावसाने जोर धरला असून पहाटेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यामुळे ३० ठिकाणी झाडे उन्मळूण पडल्याच्या घटना घडल्यात. तर १३ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या आहेत. शहरात आजही सखल भागांत पाणी साठले असून त्यातून मार्ग काढताना वाहनचालकाना कसरत करावी लागत आहे.

- इर्शाळवाडी दुर्घटनेतील लोकांना जेजे, केईएम हॉस्पिटलमध्ये मदत केली जाईल- हसन मुश्रीफमाळीण सारखी घटना घडली आहे. अनेक लोक दबले गेले आहेत. लोकांना जेजे, केईएम हॉस्पिटलमध्ये मदत केली जाईल. तिथे मोठं रुग्णालय बांधण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग नाही तर आरोग्य खात्याकडून बांधण्यासंदर्भात सूचना करू असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

-तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा तुळशी तलाव मध्यरात्रीनंतर १.२५ वाजता ओसंडून वाहू लागला आहे.

 

- सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या : सुधीर मुनगंटीवारचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. पुरग्रस्तांना मदत करताना प्रशासनाने नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे. सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या आणि तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

- मुंबईत जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता मुंबई शहर व उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून अधूनमधून ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.भरती -  दुपारी - ०१:५५ वाजता - ४.२५ मीटरओहोटी -सायंकाळी - ०७:५४ वाजता - ०१.६७ मीटरभरती - (उद्या - २१.०७.२०२३) मध्यरात्री - ०१:३८ वाजता - ३.७१ मीटर ओहोटी -(उद्या - २१.०७.२०२३) सकाळी   - ०७:१६ वाजता - ०१.०३ मीटर

- दोन हेलिकॉप्टर तयार, पण खराब हवामानामुळं टेकऑफ अशक्य - मुख्यमंत्रीरायगडातील इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेतील बचावकार्य हवाई मार्गाने करण्याचा पर्याय विचारधीन आहे. दोन हेलिकॉप्टर तयार आहेत, मात्र खराब हवामानामुळे टेकऑफ करणं शक्य नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, दुर्घटनेतील 80 जणांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आलं आहे. सध्या मुख्यमंत्री घटनास्थळी असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधून सर्व परिस्थितीची माहिती दिली.

- पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पालघर जिल्ह्यात काल सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळं जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. कंक्राडी नदीला पूर आल्याने डहाणू स्टेशन परिसरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.

-इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेतील नियंत्रण कक्षरायगडातील इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेतील ग्रामस्थांच्या नातेवाईकांना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क साधण्यासाठी हा नंबर 810 819 5554 देण्यात आला आहे.

- कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात 74569 क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. धरणाचा पाणीसाठा 37.36 झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोयना नगर 253 मीमी, नवजा 272 मीमी, महाबळेश्वर 331 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

- रत्नागिरीत सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत घट रत्नागिरीत पावसाने थोडी उसंत घेतल्याने जिल्ह्यातील वाशिष्ठी, जगबुडी आणि अर्जुना या तीनही प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. जगबुडीची पातळी कमी झाली असली तरी अजूनही पाणी धोका पातळीपेक्षा अधिक आहे. दरम्यान वाशिष्ठीच्या काल वाढलेल्या पाण्यामुळे त्यावरील पुलाच्या भरावाचा काही भाग वाहून गेला आहे.

- नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस, अनेक भागात साचलं पाणी

- सिंधुदुर्गात पूरस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेरेखोल नदीला आलेल्या पुराचे पाणी बांदा शहरातील आळवाडी, मच्छिमार्केट परिसरात घुसल्याने बाजारपेठेच्या काही भागाला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.

-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीमध्ये दाखल रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी दुर्घटनेतील बचावासाठी एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच, दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले होते. 

- इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने चार जणांचा मृत्यूरायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी याठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

- मराठवाड्यातील ४७ मंडळांत झाली अतिवृष्टीमराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर वगळता उर्वरित जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील ४७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे

- पाणीच पाणीबुलडाणा जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी कमरेएवढे पाणी साचले होते. काही गाड्याही अर्ध्याहून अधिक पाण्यात होत्या.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊसRaigadरायगडRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणMumbaiमुंबई