शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

दृष्टिदानात महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर

By admin | Published: June 10, 2015 2:02 AM

जागतिक दृष्टिदान दिन विशेष.

नितीन गव्हाळे/ अकोला : आरोग्य विभागाकडून राज्यात नेत्रदानाविषयी जनजागृतीपर कार्यक्रम राबवूनही नेत्रदान करणार्‍यांची संख्या वर्षाकाठी १0 हजारांपर्यंतही पोहोचलेली नाही. राज्याला दरवर्षी १0 हजार नेत्रगोलकांची गरज असून, ती पूर्ण होत नसल्याची वस्तुस्थिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या दृष्टिदानाच्या आकडेवारीमध्ये देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो, तर तामिळनाडू अग्रस्थानी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना दरवर्षी नेत्रगोलक संकलनाचे उद्दिष्ट देण्यात येते. महाराष्ट्राला तीन वर्षांत १८ हजार ६00 नेत्रगोलक संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. राज्याने हे उद्दिष्ट पार करून २२ हजार १0१ नेत्रगोलक संकलित केले. तामिळनाडूला २१ हजार २00 नेत्रगोलकांचे उद्दिष्ट होते. या राज्याने २६ हजार ७0४ नेत्रगोलक संकलित केले. त्यापाठोपाठ गुजरातने २२ हजार ४00 नेत्रगोलकांचे उद्दिष्ट असताना २४ हजार ९0४ नेत्रगोलक संकलित केले. आंध्रप्रदेशने १८ हजाराचे उद्दिष्ट पार करीत १८ हजार १९८ नेत्रगोलक संकलित केले. देशात १.२0 कोटी लोक दृष्टिबाधित आहेत. त्यांच्या जीवनात प्रकाश देण्यासाठी दरवर्षी पाच लाखांवर नेत्रगोलकांची गरज आहे. तीन वर्षांमध्ये देशासमोर १ लाख ७0 हजार नेत्रगोलक संकलनाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १ लाख ४३ हजार ७२३ नेत्रगोलक संकलित करण्यात आले. देशात प्रत्येकी एक हजार व्यक्तींमागे केवळ १0 व्यक्तींचे नेत्रदान केले जाते. हे प्रमाण वाढविण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी देशाने आधी नेत्रदान, मगच अंत्यसंस्कार ही पद्धत स्वीकारली पाहिजे. तरच दृष्टिबाधितांच्या आयुष्यातील अंधार दूर होईल.२0१४-१५ मध्ये झालेले राज्यनिहाय नेत्रदान (माहिती ३ मार्चपर्यंतची)राज्य              उद्दिष्ट             नेत्रदानगुजरात-           ४000              ८५४७ महाराष्ट्र-         ६000              ६९४५तामिळनाडू-      ४000              ८१८९प. बंगाल-          १२00             १२५९आंध्र प्रदेश-        ६000              १७९१कर्नाटक-           ५000               १८0२दिल्ली-             १५00               १३७४राजस्थान-         १५00                 ८१३केरळ-              ३000                १४५४हरियाणा-         १२000               १४५८