मुंबई: राज्यातील जनतेसाठी पुन्हा एकदा काहीसे चिंता वाढवणारे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ७ हजार ५०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.४४ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण १० हजार ४४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 10 442 new corona cases and 483 deaths in last 24 hours)
“कल्याणकारी योजना राबवण्यासाठीच पैसे वाचवतोय”: धर्मेंद्र प्रधान
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत १० हजार ४४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ४८३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ७ हजार ५०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ३९ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.८८ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ५५ हजार ०४१ आहे.
मुंबईकरांना काहीसा दिलासा
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ७०० नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७०४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार १८३ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १५ हजार ७७३ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ६५३ दिवसांवर गेला आहे.
दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ८० लाख ४६ हजार ५९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख ०८ हजार ९९२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ९ लाख ६२ हजार १३४ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ६ हजार १६० जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.