मुंबई: कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरली असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा चिंतेत भर टाकणारा आहे. तसेच जागतिक देशांसह भारतातही कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ७६ जणांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असून, लसीकरण झालेल्यांचाही यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. डेल्टा व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात असून, आतापर्यंत राज्यात ५ डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra reports 10 new cases of corona delta plus total count reach to 76 and 5 dead)
“राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण महाराष्ट्र गेले २० वर्षे बघतोय”; मनसेचा पलटवार
कोरोनाची लस घेतलेल्या रुग्णांनाही डेल्टा व्हेरिएंटची लागण होत असल्याचे समोर येत आहे. सध्या राज्यात डेल्टा प्लसचे एकूण ७६ रुग्ण आहेत. तर यापैकी लस घेतलेल्या १८ जणांना याची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोमवारी राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झालेल्या १० रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी सहा कोल्हापूर, तीन रत्नागिरी तर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण आहे.
Adani ग्रुपचा आता राज्याच्या व्यापारी मार्गावरही ताबा; ‘या’ कंपनीशी १६८० कोटींचा व्यवहार
कोरोना लसीचे दोनही डोस घेतले होते
राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झालेल्या एकूण ७६ रुग्णांपैकी १० रुग्णांनी कोरोना लसीचे दोनही डोस घेतले होते, तर १२ लोकांनी लसीचा एक डोस घेतला होता. या रुग्णांमध्ये ३९ महिलांचा तर ९ लहान मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या मुलांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे. डेल्टा व्हेरियंटच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी राज्यात तपासण्या करण्यात येत आहे. राज्यात डेल्टा व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मुंबईत ११, जळगावमध्ये १३, रत्नागिरीत १५, कोल्हापूरमध्ये ०७, ठाण्यात ०६, पुण्यात ०६, रायगडमध्ये ०३, पालघरमध्ये ०३, नांदेडमध्ये ०२, गोंदियात ०२, सिंधुदुर्गमध्ये ०२, तर, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, बीड या ठिकाणी डेल्टाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?
दरम्यान, महाराष्ट्राने ५ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पार करत मोठा विक्रम केला आहे. १६ ऑगस्टपर्यंत एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. मुंबईमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८३ लाख ८५ हजार १०६ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला तर त्या खालोखाल पुण्याचा नंबर लागतो. ६९ लाख ९० हजार ९४९ पुणेकरांनी लसीकरणाचा लाभ घेतला. देशातही लसीकरणाच्या बाबतीत मोठा टप्पा गाठला असून, देशभरात नागरिकांना देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या सोमवारी ५५ कोटींपलीकडे गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.