मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १० हजार ५६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.०७ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 10107 new corona cases and 237 deaths in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत १० हजार १०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत २३७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १० हजार ५६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ७९ हजार ७४६ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९४ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ३६ हजार ६६१ इतकी आहे.
मुंबईकरांना काहीसा दिलासा
मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ८३० नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत १ हजार ३०० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ११ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार २२७ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १४ हजार ९०७ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ७२७ दिवसांवर गेला आहे.
“मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का?”
दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ८६ लाख ४१ हजार ६३९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख ३४ हजार ८८० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ८ लाख ७८ हजार ७८१ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ५ हजार ४०२ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.