मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५ हजार ९८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०९ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ३ हजार ६३६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 3626 new corona cases and 37 deaths in last 24 hours)
“…तर तालिबानने जावेद अख्तर यांना चौकात फटके मारले असते”; भाजपचे टीकास्त्र
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ६३६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ३७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ५ हजार ९८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ७५५ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ४७ हजार ६९५ इतकी आहे.
नोकरीची सुवर्ण संधी! आधार कार्ड बनवणाऱ्या UIDAI मध्ये विविध पदांसाठी भरती; पाहा, डिटेल्स
मुंबईकरांच्या चिंतेतही काहीशी भर
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ३७९ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ४१७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९९८ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ३ हजार ७७१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०६ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १२९० दिवसांवर गेला आहे.
दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४९ लाख ९९ हजार ४७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८९ हजार ८०० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात ३ लाख ०३ हजार १६९ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १ हजार ९६३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.