मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक असे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ६ हजार ७९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०५ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ३ हजार ६४३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 3643 new corona cases and 105 deaths in last 24 hours)
“दहीहंडी होणारच; घरात बसून सबुरीचे आम्हाला नकोत”; भाजपचा एल्गार
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ६४३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १०५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ६ हजार ७९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ३८ हजार ७९४ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ४९ हजार ९२४ इतकी आहे.
“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा
मुंबईकरांनाही दिलासा
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ २२६ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत २९७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९५१ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २ हजार ८०१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १९८३ दिवसांवर गेला आहे.
दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २४ लाख ४५ हजार ६८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख २८ हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात ३ लाख ०२ हजार ८८८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ४८७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार, परभणी, नांदेड, अकोला, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळले आहेत.