मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायाला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४ हजार ६९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०२ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ३ हजार ७४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 3741 new corona cases and 52 deaths in last 24 hours)
राज्य बँकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी ५१ लाखांची मदत; उद्धव ठाकरेंकडे धनादेश सुपूर्द
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ७४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ५२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजार ६९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ६८ हजार ११२ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५१ हजार ८३४ इतकी आहे.
कोविडची तिसरी लाट, डेल्टामुळे महापालिका सतर्क; आयुक्तांनी घेतली आढावा बैठक
मुंबईकरांच्या चिंतेतही काहीशी भर
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ३३४ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ३१० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९७६ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ३ हजार ०५६ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १५७७ दिवसांवर गेला आहे.
उर्वरीत २६ टक्के नागरिकांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य; आयुक्तांचे आरोग्य विभागाला आदेश
दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३८ लाख १२ हजार ८२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ६० हजार ६८० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात २ लाख ८८ हजार ४८९ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार २९९ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. मालेगाव, धुळे, जळगाव, हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या पाच जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळले आहेत.