मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत २ हजार ५०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०२ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार १३० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 4130 new corona cases and 64 deaths in last 24 hours)
‘त्या’ यादीतील राजू शेट्टींच्या नावाबाबत शरद पवार यांनी सोडले मौन; म्हणाले...
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ६४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच २ हजार ५०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ८८ हजार ८५१ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५२ हजार ०२५ इतकी आहे.
तारीख ठरली! पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ‘खेला होबे’ होणार; ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढवणार
मुंबईकरांच्या चिंतेतही काहीशी भर
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ४१६ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ३८२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९९१ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ३ हजार ५६१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १३७९ दिवसांवर गेला आहे.
दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४६ लाख ६० हजार ८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८२ हजार ११७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात ३ लाख ०२ हजार १९६ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ०१३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त उपचाराधीन रुग्ण असून, राज्यातील एकूण १७ जिल्ह्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या १०० च्या खाली आहे.