शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

Corona In Maharashtra: निष्काळजीपणा नको! महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला, नव्या व्हेरिअंटचे १८ रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 10:00 PM

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने चिंता वाढवली आहे. कोरोना रुग्णांमध्ये जसजशी वाढ होत आहे, तसं ओमायक्रोनचेही उप-प्रकार समोर येत आहेत. ...

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने चिंता वाढवली आहे. कोरोना रुग्णांमध्ये जसजशी वाढ होत आहे, तसं ओमायक्रोनचेही उप-प्रकार समोर येत आहेत. १ ते १५ ऑक्टोबरपर्यंत Omicron XBB उप-प्रकारचे एकूण १८ रुग्ण आढळून आले आहेत. Omicron च्या BA.2.75 आणि BJ.1 उप-प्रकारांचे हे संयुक्त रुप आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने बुधवारी याबाबतची माहिती दिली. या १८ रुग्णांमध्ये पुण्यातील १३, ठाणे आणि नागपूरमधील प्रत्येकी २ आणि अकोल्यात एका रुग्णाचा समावेश आहे. 

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४१८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवाळीचा सण लक्षात घेता राज्य सरकारने ओमायक्रॉनच्या XBB व्हेरिअंटसाठी अलर्ट जारी केला आहे आणि कोविड 19 प्रोटोकॉलचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार XBB व्हेरिअंट इतर सर्व उप-प्रकारांपेक्षा प्रबळ आहे. जो जगाच्या अनेक भागांमध्ये आढळून आला आहे.

दिवाळीपूर्वी महाराष्ट्र-केरळमध्ये नवा धोका, मुंबईत तीन दिवसांत १५० रुग्णमुंबईत गेल्या तीन दिवसांत १५० हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या ५ दिवसांत १० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ४७७ रुग्ण आढळले होते. त्यापैकी १७८ रुग्ण एकट्या मुंबईतील होते. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राशिवाय केरळमध्येही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.

हिवाळ्यात प्रसार वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाजथंडीच्या दिवसात कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईत इन्फ्लूएंझासारख्या आजारांवरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. इन्फ्लूएंझा हा देखील संसर्गजन्य रोग आहे. तो शिंकण्याने पसरतो. तज्ज्ञांनी अशी भीतीही व्यक्त केली आहे की, काही लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो पण ते त्याला किरकोळ सर्दी-खोकला समजू शकतात, त्यामुळे इतरांमध्ये पसरण्याचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांनी पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी मास्क काटेकोरपणे वापरण्याचा सल्ला दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOmicron Variantओमायक्रॉन