मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायाला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४ हजार ६८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०३ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार १९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 4196 new corona cases and 104 deaths in last 24 hours)
घे भरारी! देशाच्या अर्थव्यवस्थेची विक्रमी कामगिरी; पहिल्या तिमाहीत २०.१ टक्के नोंदवला GDP
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार १९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजार ६८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ७२ हजार ८०० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५१ हजार २३८ इतकी आहे.
“देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका”; भाजपचा ठाकरे सरकारवर घणाघात
मुंबईकरांच्या चिंतेतही काहीशी भर
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ३२३ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत २७२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत एका रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९७७ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ३ हजार १०६ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १५११ दिवसांवर गेला आहे.
“सत्तेच्या गैरवापराबाबत सुप्रिया सुळे यांनी वडिलांना विचारावं”; चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर
दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३९ लाख ७६ हजार ८८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ६४ हजार ८७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात २ लाख ९१ हजार ७०१ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार १२१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. जळगाव, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या पाच जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळले आहेत.