मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक असे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना पाहायाला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४ हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०४ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ५ हजार १०८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 5108 new corona cases and 159 deaths in last 24 hours)
डिझेल वाहनांचे उत्पादन कमी करा, पर्यायांवर भर द्या; नितीन गडकरींनी दिल्या कंपन्यांना सूचना
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १५९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ५२ हजार १५० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५० हजार ३९३ इतकी आहे.
मोदी सरकारची BPCL खासगीकरणासाठी तयारी सुरू; ‘या’ तीन कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ
मुंबईकरांच्या चिंतेतही काहीशी भर
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ३९७ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ५०७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९६३ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २ हजार ७३६ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १८२५ दिवसांवर गेला आहे.
दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३० लाख ४८ हजार ०७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ४२ हजार ७८८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात २ लाख ९३ हजार १४७ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ३३४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. नोंदीनुसार जिल्ह्यात १३ हजार ८५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ७ हजार ९२, सातारा जिल्ह्यात ५ हजार ३८१, सांगली जिल्ह्यात ४ हजार ६९१, अहमदनगर जिल्ह्यात ४ हजार ५७५ तर मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार १७६ सक्रिय रुग्ण आहेत.