शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

CoronaVirus News in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, दिवसभरात 55 हजार 469 नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 10:00 PM

CoronaVirus News in Maharashtra : मंगळवारी राज्यात दिवसभरात 55 हजार 469 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

ठळक मुद्देपुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे राज्याची चिंता अद्याप कायम आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 55 हजार 469 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 34 हजार 256 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 297 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात काल कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे राज्याची चिंता अद्याप कायम आहे. (Maharashtra reports 55,469 new COVID cases, 34,256 recoveries, and 297 deaths in the last 24 hours)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राज्यात दिवसभरात 55 हजार 469 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 34 हजार 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.98% एवढे झाले आहे.  राज्यात आजपर्यंत एकूण 25,83,331 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. तसेच, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,09,17,486 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 31,13,354 (14.88 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24,55,498 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 22,797 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईने कोरोना रुग्णसंख्येत 10 हजाराचा टप्पा ओलांडला!मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 10 हजार 30 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. तसेच, मुंबई शहरातील रुग्ण बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 81 टक्क्यांवर आले आहे. तर आतापर्यंत 3 लाख 82 हजार 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग आता 38 दिवसांवर आला आहे. 30 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान कोरोना रुग्ण वाढीचा दर 1.79 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.

("25 वर्षांवरील सर्वांना लस द्या", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती)

25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे - राजेश टोपे"केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज विविध राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत राज्यांमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे.त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा. 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश देणेबाबत विनंती केली. यावेळी राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते", अशी माहिती टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटल