मुंबई : महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. रविवारी राज्यात 57 हजार 074 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 27 हजार 508 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 222 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे. (Maharashtra reports 57,074 new COVID cases, 27,508 recoveries, and 222 deaths in the last 24 hours)
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 57 हजार 074 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 27 हजार 508 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण 25 लाख 22 हजार 823 करोना बाधित रुग्ण झाले बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.8 टक्के एवढे आहे.
राज्यात सध्या 4 लाख 30 हजार 503 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात आज 222 रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 5 लाख 40 हजार 111 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 30 लाख 10 हजार 597 (14.66 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आहेत. तर सध्या राज्यात २२,०५,८९९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 19,711 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
(Lockdown in Maharashtra: शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन; नवाब मलिकांची घोषणा)
मुंबईत कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 11,163 नवे रुग्णकोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतच्या नवीन उच्चांकाची नोंद रविवारी मुंबईत झाली. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यावे वाढत असून परिस्थिती एकदम गंभीर होत चालली आहे मुंबईत आज दिवसभरात तब्बल 11 हजार 163 नवे रुग्ण आढळले. तर 25 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईतील दैनंदिन रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1.54 टक्क्यांवर पोहोचला आहे.