कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६७,०१३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर कोरोनामुळे ५६८ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात सात लाखांच्या जवळपास अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात कोरोनाचा कहर अद्यापही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात नव्या ६७,०१३ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे थोडी दिलासादायक बाब म्हणजे ६२,२९८ जण उपचारांनंतर कोरोनामुक्त झाले. गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनामुळे ५६८ मृत्यूंची नोंद करण्यात आली. आतापर्यंत राज्यात एकूण ४०,९४,८४० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण ३३,३०,७४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,९९,८४० जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८१.३४ टक्क्यांवर आला आहे.
चोवीस तासांत राज्यात ६७,०१३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ६२ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 9:33 PM
मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक
ठळक मुद्देराज्यात ६२ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्तमुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक