शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 12:45 PM2021-09-04T12:45:10+5:302021-09-04T12:46:10+5:30

"प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो."

Maharashtra Revenue Minister Balasaheb Thorat talk about their cool nature and political life | शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...

शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...

Next

मुंबई - काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे त्यांच्या शांत स्वभावासाठी परिचित आहेत. त्यांनी नुकतीच लोकमतला औपचारीक आणि राजकारणा पलीकडे जाऊन मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर दिलखुलासपणे भाष्य केले आणि अनेक किस्सेही सांगितले. यावेळी आपल्या या शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला आहे का? असा प्रश्न केला असता, त्यांनी यावर अगदी मनमोकळेपणाने भाष्य केले. अशा स्वभावामुळेच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो, असे ते म्हणाले. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांची ही मुलाखत घेतली. (Maharashtra Revenue Minister Balasaheb Thorat talk about their  cool nature and political life)

आपल्या शांत स्वभावासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो. यासाठी माझा शांत स्वभावही कारणीभूत असेल, कारण मी कुणाला, फारसा दुखावण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही. पण याचा तोटाही जास्त आहे याचा, कधी अशांतही झाले पाहिजे. ते होत नसावा हा तोटा आहे माझा. त्यामुळे तोटाही कधी होत असेल. कधी कधी लवकर गरम होणारे जे असतात, त्यांच्यासाठीही काही फायदे असतात काही तोटे असता. प्रत्येक स्वभावाचे काही फायदे काही तोटे आहेत."

...म्हणून शरद पवारांसोबत गेलो नाही! बाळासाहेब थोरातांनी सांगितला त्यांच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट

यावेळी त्यांनी आपल्या शालेय शिक्षणापासून, उच्च शिक्षणापासून ते आपण राजकारण कस कसे आलो, यावरही भाष्य केले. बाळासाहे थोरातांनी वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर वकीलीही सुरू केली होती. यासंदर्भात आपल्याला पहिल्या वकिलीची फीस किती मिळाली? असे विचारले असता, थोरात म्हणाले, "मी जेव्हा वकिली करायचो, तेव्हा माझे वडील कारखान्याचे चेअरमन होते आणि आमदारही होते. त्यावेळी असे व्हायचे की, ज्या लोकांची कामे तहसील कचेरीत गुंतलेली असायची, एमएसईबीमध्ये गुंतलेली असतील, त्या लोकांनी त्यांना शोधण्याऐवजी मलाच शोधायला सुरुवात केली. काही केसेस मी चालवल्या, ते १० रुपयांसारखे खर्चायला पैसे द्यायचे, मी पाचशे हजार रुपयांपर्यंतही गेलो होतो. पण मी आमदार होण्यामागे वकिलीही एक कारण आहे. नंतर अनेक चळवळींमुळे राजकारणात आलो आणि वकिली सुटली," असे थोरात म्हणाले.

Web Title: Maharashtra Revenue Minister Balasaheb Thorat talk about their cool nature and political life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.