दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली. (Maharashtra SSC 10th Board Exam Result 2022)
या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. हा निकाल 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता http://www.mahresult.nic.in या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.
कुठे कुठे पाहता येणार? या आहेत लिंक...
लिंक १लिंक २, लिंक ३ यावर क्लिक करा.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती https://t.co/g7ZbJdsffV या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गेल्या काही दिवसांपासून इयत्ता १० वीचा निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वीच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. त्यानुसार उद्या दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीनं इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.