शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र स्टेट को-आॅप हाऊसिंग फायनान्सच्या अध्यक्षपदी व्ही.बी.पाटील, बिनविरोध निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:59 PM

महाराष्ट्र स्टेट को-आॅप हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्ही. बी. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे सुनिल देवीदास जाधव यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक अधिकारी प्रशांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत संस्थेच्या मुख्यालयात संचालक मंडळाची सभा झाली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र स्टेट को-आॅप हाऊसिंग फायनान्सच्या अध्यक्षपदी व्ही.बी.पाटीलबिनविरोध निवडी, उपाध्यक्षपदी औरंगाबादचे सुनिल जाधव

कोल्हापूर : वार्षिक दीडशे कोटींची उलाढाल आणि एक हजार ७१० मतदार असलेल्या महाराष्ट्र स्टेट को-आॅप हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्ही. बी. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे सुनिल देवीदास जाधव यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक अधिकारी प्रशांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत संस्थेच्या मुख्यालयात संचालक मंडळाची सभा झाली.व्ही. बी. पाटील हे संचालक म्हणूनही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी संचालक व अध्यक्ष म्हणूनही या संस्थेत चांगले काम करून दाखविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते अत्यंत निकटवर्ती मानले जातात.

अडचणीत असलेल्या म्हणजे कर्जव्यवहार बंदच असलेल्या या संस्थेला नव्याने उर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठीच यापूर्वीचा चांगल्या कामाचा अनुभव असलेल्या पाटील यांच्याकडे संस्थेची जबाबदारी देण्यात आली आहे.संस्थेच्या निवडणुकीत १२ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने कब्जा केला. काँग्रेसला चार, तर भाजपला पाच जागा मिळाल्या होत्या. दोन्ही काँग्रेसची आघाडी होती. या संस्थेची निवडणूक तब्बल ११ वर्षांनंतर यंदा १ जुलैला झाली. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी राज्यभरातील १७०८ गृहनिर्माण संस्था प्रतिनिधी मतदानाचा हक्क होता.

 दि महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅप. हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लि.मुंबईच्या २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी पंचवार्षिक (२०१८ ते २०२३) निवडणूक झाली.  गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रतिनिधी याचे मतदार आहेत. ही संस्था सोसायट्यांना तर सोसायट्या सभासदांना गृहनिर्माणासाठी वित्त पुरवठा करते. या कार्पोरेशनचे २१ पैकी सात संचालक बिनविरोध झाल्याने उर्वरित १४ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने संयुक्तपणे प्रगती पॅनल रिंगणात उतरविले. पुण्याचे राष्ट्रवादीचे माजी महापौर अंकुश काकडे, जळगावचे आमदार डॉ. सतीश पाटील आणि औरंगाबादचे काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड या पॅनलचे नेतृत्व करीत होते. तर भाजपा समर्थित सहकार पॅनल रिंगणात असून मुंबईचे आमदार प्रवीण दरेकर व नाशिकचे माजी आमदार वसंत गिते त्याचे नेतृत्व करीत होते. हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद अनुक्रमे रवींद्र गायगोले (अमरावती) व योगेश पारवेकर (यवतमाळ) यांच्या रुपाने भाजपाच्या हाती आणि त्यातही विदर्भाकडे होते.  सात संचालक अविरोधकार्पोरेशनच्या या निवडणुकीत सात संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रगती पॅनलचे आमदार डॉ. सतीश पाटील (जळगाव), विजय पाटील (जळगाव), व्ही.बी. पाटील (कोल्हापूूर), सागर काकडे (पुणे) व ललित चव्हाण (सातारा) तर भाजपा समर्थित सहकार पॅनलचे आमदार बाळासाहेब सानप (नाशिक) व माजी आमदार वसंत गिते (नाशिक) यांचा समावेश आहे. कार्पोरेशनचे सर्वाधिक चार संचालक मराठवाड्यात आहेत. पुणे तीन, नाशिक तीन, मुंबई, कोकण, अमरावती व नागपूर विभागाला प्रत्येकी दोन संचालक आहेत. अविरोध सात पैकी पाच संचालक प्रगती पॅनलचे आहेत.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर