पुणे : महाराष्ट्रात आलेली उष्णतेची लाट गुरुवारीही कायम होती. चंद्रपूरमध्ये हंगामातील सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील आणखी दोन दिवस उष्णतेची ही लाट कायम राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उकाड्याची तीव्रता सर्वाधिक आहे. सोलापुरातही गेल्या पन्नास वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.उत्तरेकडून महाराष्ट्रात उष्णवारे वाहत आहे. त्यातच राज्यातील हवामानही कोरडे असल्यामुळे उष्णवाऱ्यांची तीव्रता अधिक जाणवत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशामध्ये उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात तर रात्रीही उकाड्याची तीव्रता वाढली आहे. चंद्रपूरपाठोपाठ ब्रह्मपुरीमध्ये ४५.२, परभणीत ४५.१, उपराजधानी नागपूर, नांदेड व वर्ध्यात ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. (प्रतिनिधी)> विदर्भात तर रात्रीही उकाड्याची तीव्रता वाढली आहे. चंद्रपूरपाठोपाठ ब्रह्मपुरीमध्ये ४५.२, परभणीत ४५.१, उपराजधानी नागपूर, नांदेड व वर्ध्यात ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे.सोलापुरातही गेल्या पन्नास वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.> प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)पुणे ४०, जळगाव ४३, कोल्हापूर ३९.९, महाबळेश्वर ३४, मालेगाव ४४.४, नाशिक ३८.५, सांगली ४२.७, सातारा ४०.६, सोलापूर ४४.९, मुंबई ३२, अलिबाग ३१.३, रत्नागिरी ३२.४, डहाणू ३३.४, उस्मानाबाद ४३.८, औरंगाबाद ४१.८, परभणी ४५.१, नांदेड ४५, अकोला ४३.६, अमरावती ४२.६, बुलडाणा ४०.७, ब्रह्मपुरी ४५.२, चंद्रपूर ४५.६, गोंदिया ४३.३, नागपूर ४५, वाशिम ४०, वर्धा ४५, यवतमाळ ४३.५.
महाराष्ट्र होरपळला!
By admin | Published: April 22, 2016 4:04 AM