मुंबई: प्रचंड आर्थिक संकटात असलेल्या Air India च्या खासगीकरणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. मात्र, कोरोना काळामुळे खासगीकरणाच्या प्रक्रियेला काहीसा उशीर होत असल्याचे सांगत आहे. आर्थिक चणचणीमुळे एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच अनेक मालमत्ता विकत असल्याचेही म्हटले जात आहे. यातच आता मुंबईतील नरिमन पॉईंटवरील आयकॉनिक एअर इंडियाच्या इमारतीच्या खरेदीबाबत ठाकरे सरकारने पुन्हा चर्चा सुरू केल्याचे सांगितले जात आहे. (maharashtra thackeray govt resumes discussion on buying Air India building at nariman point)
महाराष्ट्राचे मुख्य सचिव एस. जे. कुंटे यांनी मंगळवारी एअर इंडियाचे सीएमडी राजीव बंसल यांच्यासोबत बैठक केली. ठाकरे सरकार १,४०० कोटी रुपयांत ही इमारत खरेदी करण्यास इच्छूक आहे. मात्र, एअर इंडियाने इमारतीची किंमत २ हजार कोटी रुपये असल्याचे बैठकीत सांगितले.
“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!
जमीन राज्य सरकारच्या मालकीची
एअर इंडियाची इमारत ज्या जमिनीवर उभी आहे, ती जमीन राज्य सरकारच्या मालकीची आहे. एअर इंडियाने खर्च म्हणून राज्य सरकारला ४०० कोटी रुपये देणे आहे. त्यामुळे या संपूर्ण करारावर २ हजार ४०० कोटी रुपये खर्च होतील. एअर इंडियाला जर इमारतीच्या विक्रीची प्रक्रिया पुढे न्यायची असेल तर त्यांनी मूल्यांकनाची प्रत द्यावी, असे राज्य सरकारने सांगितले आहे. इमारतीच्या प्रस्तावीत विक्रीबाबत एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याचे कुंटे यांनी कबूल केले. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे.
“आरक्षणाच्या मुद्द्यावर नारायण राणे, रावसाहेब दानवे का बोलले नाहीत?”: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस सरकारने दाखवला होता रस
२०१८ मध्ये एअर इंडियाला तोटा झाल्यानंतर त्यांनी जमीन आणि इमारतीतील भाडेपट्टीचे हक्क विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विखुरलेली कार्यालये एका इमारतीत आणण्यासाठी ही इमारत खरेदी करण्यात रस दाखवला होता. या २३ मजली इमारतीसाठी राज्य सरकारने १ हजार ४०० कोटी रुपयांची बोली लावली होती. ही रक्कम इमारतीच्या राखीव किमतीपेक्षा २०० कोटी रुपयांनी कमी आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या इमारतीची किंमत २ हजार कोटी रुपये असल्याचा दावा एअर इंडियाने केला आहे.
“समाजात असमानता असेपर्यंत आरक्षण कायम राहणार, RSS चा भक्कम पाठिंबा”
दरम्यान, एअर इंडियाने ही इमारत रिकामी केली असून फक्त वरचा मजला त्यांच्या ताब्यात आहे. उर्वरित इमारत त्यांनी भाड्याने दिली आहे. त्यातून त्यांना महसूल मिळतोय. बैठकीत सहभागी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इमारतीचे ठिकाण आणि ते मंत्रालयाजवळ असल्यामुळे सरकार खरेदी करण्यास इच्छूक आहे.