शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बदलतोय- गडकरी

By admin | Published: November 01, 2016 4:17 AM

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कामे केली

नागपूर- केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कामे केली परंतु ती सर्व सागंता येणे त्यांनाही शक्य झाले नाही. दीक्षाभूमीला अ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा, ड्रॅगन पॅलेस व चिचोलीचा विकास, ताजबागचा विकास आदी अनेक कामे आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश बदलत आहे, तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बदलत आहे तसेच शहरात प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात नागपूरही बदलत आहे, असे ते म्हणाले. भारनियमनमुक्त राज्य केवळ फडणवीस सरकारनेच केले. मिहानमध्ये ५० हजारापेक्षा जास्त रोजगार मिळेल. सध्या २७ कंपन्या सुरू असून ९७०० लोकांना रोजगार मिळाला आहे. पाच वर्षे पूर्ण होतील, तेव्हा कंपन्यांची नावे व लोकांना मिळालेला रोजगार नावानिशी जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भद्रावती येथे कोळशापासून युरिया तयार करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. एकूणच दोन वर्षात भरपूर कामे झाली. ही केवळ न्यूज रिल होती. संपूर्ण फिल्म अजून बाकी आहे, असे सांगत सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहनही त्यांनी केले. ।शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहिले. १८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. विमाधारक शेतकऱ्यांची संख्या ८० लाखापर्यंत नेण्यात आली. एका वर्षातच चार हजार कोटी विम्यापोटी दिले. अमरावती येथे टेक्स्टाईल पार्क सुरू केले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. आता लवकरच ह्यफार्म टू फॅशनह्ण(शेतीपासून फॅशनपर्यंत) ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ह्यअप्रॉल पार्कह्ण सुरू केले जाणार आहे. नागपुरातही संत्र्यावर अधारित प्रक्रिया केंद्र लवकरच सुरू होणार आहे. राज्यातील ११ जिल्ह्यात अ‍ॅग्रो प्रोसेसिंग युनिट सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गुन्हेगारीमध्येसुद्धा राज्याचा ग्राफ कमी होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावले जात आहेत. यामुळे वाहतूकही स्मार्ट झाली आहे. राईट टू सर्व्हिसमुळे ३७० सेवांचा समावेश करण्यात आला आहे. ९९ टक्के लोकांना या सेवा वेळात मिळत आहेत. स्मार्ट शहरेच नव्हे तर गावेही स्मार्ट होत आहेत. डिजिटलायझेशनवर चांगले काम होत आहे. नागपूर जिल्हा डिजिटयलायझेशन झाला आहे. २०१८ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र डिजिटलायझेशन होईल, असा दावाही त्यांनी केला. शहर ग्रामीण प्रत्येक क्षेत्रात पथदर्शी काम केले. महाराष्ट्र देशातील नंबर एकचे राज्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक आ. सुधाकर कोहळे यांनी केले. संचालन नगरसेवक संदीप जोशी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ।विदर्भासाठी तीन रुपयाने विजेचे दर कमी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही अभिनंदन केले. विदर्भात वीज होते पण विदर्भालाच त्याचा लाभ मिळत नसल्याची ओरड केली जात होती. बावनकुळे यांनी विदर्भासाठी तीन रुपयांनी विजेचे दर कमी केल्याची माहिती दिली. शंभरापेक्षा अधिक जागा जिंकून देणारशहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी आपल्या प्रास्ताविकेत मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूरच्या विकासाला कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. या विकास कामाच्या जोरावर येत्या मनपा निवडणुकीमध्ये १०० पेक्षा अधिक जागा जिंकून देणारा, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. >गडकरींची राज्याला सर्वाधिक मदत महाराष्ट्राला आजवर कुणीही केली नसेल इतकी मदत नितीन गडकरी यांनी केली आहे. महामार्गासाठी त्यांनी हजारो कोटी रुपये दिले. त्यामुळेच नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग सुरू करीत आहोत. हा केवळ महामार्ग नाही. तो विकासाचा मार्ग आहे. २४ जिल्ह्याला याचा लाभ होईल. यावर आणखी २४ नवीन शहरे निर्माण केली जात आहेत. या महामार्गाद्वारे फायबर आॅप्टिक केबल टाकले जात आहे. यासोबतच गॅस व पेट्रोकेमिकल पाईप टाकण्याची विनंती आपण केंद्राला केली होती. ती सुद्धा मान्य झाली आहे. आता गॅस आणि पेट्रोकेमिकल लाईन या महमार्गाखालून टाकली जाणार आहे. त्यामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूला गॅस व पेट्रोकेमिकलवर आधारित उद्योग स्थापन करता येऊ शकतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. >लकवाछाप मंत्र्यांमुळे कामे थांबलीकेंद्रीय मंत्री गडकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत आघाडी सरकारचा समाचार घेतला. लकवाछाप मंत्र्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक कामे थांबली. लकवाछाप हा माझा शब्द नसून शरद पवारांनी दिलेला शब्द असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नाव्हा शेवा ते शेवडी हा ट्रान्सहार्बर लिंकचा आराखडा मी तयार करून दिला होता. परंतु ते काम थांबले. आता ते काम पुन्हा सुरू केले जाईल. फुले, शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन महाराष्ट्राला गर्तेत लोटण्यात आले. परंतु गेल्या दोन वर्षात गतिशील निर्णय घेण्यात आले.